शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प उद्घाटने रद्दची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:59 IST

आरोप झाल्याने सत्ताधाऱ्यांची चपळाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या दौºयात महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाºया प्रकल्पांची ‘ई’ उद्घाटने करण्याचे जाहीर केले होते. मात्र, वडमुखवाडीतील पंतप्रधान आवास योजनेवरून आरोप झाल्याने उद्घाटने लांबणीवर टाकण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केवळ चापेकर राष्टÑीय संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.महापालिकेतर्फे चार दिवसांपूर्वी वडमुखवाडीतील पंतप्रधान आवास योजना, चºहोलीतील वेस्ट टू एनर्जी, चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांचे राष्टÑीय संग्रहालय अशा प्रकल्पांचे नियोजन केले होते. पंतप्रधान आवास योजनेवरून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने एकच कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सत्ताधाºयांनी जाहीर केले आहे. याबाबत शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी उद्घाटने लांबणीवर टाकण्याची नामुष्की आली नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच आवास योजना उद्घाटनासाठी पंतप्रधान येणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम रद्द केल्याचे जगताप म्हणाले.मुख्यमंत्री सोमवारी शहरात येत आहेत. त्यामुळे पदाधिकारी बदलावर काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. महापौरपदासाठी स्थायी समिती सभापतीपदासाठी डावलण्यात आलेले आमदार महेश लांडगे समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, नामदेव ढाके यांच्या नावांचा विचार होऊ शकतो. स्थायी समितीपद चिंचवडकरांकडे आहे. त्यामुळे महापौरपद भोसरीकरांकडे कायम ठेवण्याची शक्यता आहे. उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.कारभारी बदल : आज होणार निर्णयमहापालिकेतील महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता बदलणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या शहरात येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस पालिकेतील पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महापालिकेतील कारभाºयांनी सर्व नगरसेवकांना विविध पदांवर संधी देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार स्थायी समितीतील सदस्यांना एक वर्षांचाच कार्यकाळ दिला होता. त्यानंतर विषय समितींचे सभापती, प्रभाग समिती अध्यक्ष बदलले. महापौर बदलाचेही संकेत दिले होते. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार यांना बदलणार की नाही. याबाबत महापालिकेतील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड