शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सुट्या पैशाअभावी पर्यटकांची गैरसोय

By admin | Updated: November 10, 2016 01:24 IST

केरळ, कन्याकुमारी, राजस्थान, हैदराबाद या ठिकाणी, तसेच बॅँकॉक, सिंगापूर या ठिकाणी परदेश दौऱ्यावर गेलेल्या पर्यटकांना पावलोपावली सुटे पैसे उपलब्ध होण्यास

पिंपरी : केरळ, कन्याकुमारी, राजस्थान, हैदराबाद या ठिकाणी, तसेच बॅँकॉक, सिंगापूर या ठिकाणी परदेश दौऱ्यावर गेलेल्या पर्यटकांना पावलोपावली सुटे पैसे उपलब्ध होण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यांच्याकडे असलेल्या हजार, पाचशेच्या नोटा चलनात येत नसल्याने गैरसोयींशी सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. परदेशात गेलेल्या पर्यटकांना तरी त्या देशाचे चलन उपलब्ध होत असल्याने, तसेच डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर करता येत असल्याने अडचणी कमी आहेत. मात्र, देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.दिवाळीची सुटी संपून शाळा सुरू होण्यास आणखी एक आठवड्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळे काहींनी या आठवड्यात राज्यातील पर्यटन स्थळांना, तसेच बाहेरच्या राज्यात पर्यटनास जाण्यास प्राधान्य दिले आहे. पर्यटनास निघून गेल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याचा निर्णय घेतला. एटीएमचे व्यवहार ठप्प झाले. नव्या नोटा चलनात येण्यास काही दिवसांचा अवधी असल्याने बँका बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे शंभराच्या नोटा उपलब्ध होईनात, हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास दुकानदार, पेट्रोलपंप चालकांनी नकार दिला. दूरच्या प्रवासाला गेलेल्यांना हजार, पाचशेच्या नोटा घेऊन गेलेल्यांना पदोपदी अडचणी जाणवू लागल्या आहेत. रेल्वेगाडीचे आरक्षण करून कोणी आठ दिवसांच्या, तर कोणी १५ दिवसांच्या दौऱ्यावर गेलेल्यांची पंचाईत झाली. (प्रतिनिधी)