शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पदपथ उखडल्याने पादचाऱ्यांची गैरसोय

By admin | Updated: May 6, 2017 02:20 IST

काही महिन्यांपासून वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौक ते संत नामदेव चौकादरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : काही महिन्यांपासून वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौक ते संत नामदेव चौकादरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्याकरिता सुस्थितीत असणारा पदपथ उखडून टाकल्यामुळे व राडारोडा अस्ताव्यस्त पसरल्यामुळे नागरिकांना त्यावरून चालणे अशक्य झाले आहे. निगडी येथील अप्पूघर ते डांगे चौक दरम्यान पाणीपुरवठ्यासाठी मोठी वाहिनी टाकण्याचे काम नागपूरच्या एका कंपनीकडे पालिका प्रशासनाने सोपविले आहे. या कामासाठी वाल्हेकरवाडी येथील मुख्य चौकातून जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्याकरिता काही महिन्यांपूर्वी पदपथावर बसविण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक उखडून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. उखडून टाकण्यात आलेले ब्लॉक रस्त्याच्या बाजूने अस्ताव्यस्त पडलेले आहेत. तर बरेच ब्लॉक चोरीस गेले आहेत. ठेकेदाराने ब्लॉक काढताना दक्षता घेतली असती आणि ते व्यवस्थित ठेवले असते, तर त्याचा पुनर्वापर करता आला असता. परंतु खर्चामध्ये काटकसर करण्याऐवजी नागरिकांच्या पैशांच्या उधळपट्टीचे धोरण पालिकेने तयार केले आहे काय, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. दुर्लक्ष : पेव्हिंग ब्लॉक चोरीला ठेकेदाराने स्वत:चे काम पूर्ण करण्यासाठी पदपथाची केलेली दुरवस्था पूर्वस्थितीत करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून त्यांनी याकरिता दुसरी निविदा न काढता स्वत:च्या पैशांनी करावी, अशीही मागणी केली जात आहे. चांगल्या स्थितीत असणारे चोरीला गेलेले ब्लॉक काही नागरिकांच्या घरासमोर दिसून आले आहेत.मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले काम आम्हाला त्रासदायक ठरत असून याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. आमची स्वमालकीची दुकाने रस्त्याच्या लगत आहेत. पदपथ खोदून ठेवल्यामुळे ग्राहकांना जा-ये करणे अवघड होत आहे. काम त्वरित पूर्ण करून उखडलेला पदपथ पूर्ववत करावा - सचिन शिवले, हॉटेल व्यावसायिक आजपर्यंत वाल्हेकरवाडीचा विकास या ना त्या कारणाने रखडलेला आहे. कसे तरी काही महिन्यांपूर्वी पदपथावर ब्लॉक बसवून नागरिकांची सोय करण्यात आली होती. परंतु जलवाहिनीच्या कामासाठी पदपथ उखडून टाकल्यामुळे आम्हाला जीव मुठीत धरून चालावे लागते. - बाळासाहेब वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते,वाल्हेकरवाडी