शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लांबचे मतदान केंद्र मिळाल्याने अडचणींत भर

By admin | Updated: February 18, 2017 03:17 IST

महापालिका निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवरील अधिकारी नेमण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून प्रशासनाने शिक्षकांना नेमण्यात

पिंपरी : महापालिका निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवरील अधिकारी नेमण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून प्रशासनाने शिक्षकांना नेमण्यात आलेली केंद्रेही निश्चित केली आहेत. परंतु, या मतदान केंद्र वाटपामध्ये महिला शिक्षिकांना २५ ते ३० किलोमीटर अंतरावरील ठिकाणे देण्यात आल्याने त्यांची अडचण झाली आहे. महिला शिक्षिकांना दहा ते बारा किलोमीटरच्या आतील केंद्र मिळावीत, अशी विनंती करण्यात येत आहे. तसे करणे शक्य नसल्यास शिक्षकांना सामंजस्याने केंद्रांची अदलाबदल करू देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महिला शिक्षिकांमधून करण्यात येत आहे. येत्या २१ फेब्रुवारी रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान केंद्रांवर एक केंद्राध्यक्ष अणि मतदान अधिकारी नेमण्यात येतात. यावेळी मतदानासाठी चार मशिन्स ठेवण्यात येणार आहेत.मतदान सुरू होण्याच्या साधारण एक ते दीड तास आधी केंद्रावर पोचावे लागते आणि मतदान संपल्यानंतर चार ते पाच तास थांबावे लागते. त्यामुळे भल्या पहाटे घराबाहेर पडलेल्या शिक्षिकांना रात्री घरी येण्यास खूप उशिर होतो. यावेळी तर कोणाला कोणत्या मतदान केंद्रावर नेमण्यात आले आहे, याची माहिती आदल्या दिवशी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आधी जाऊन केंद्र पाहून घेण्याची सोयच राहिली नाही.‘लोकमत’शी संपर्क साधून आपली कैफियत मांडलेली एक शिक्षिका कोथरूड परिसरात राहण्यास आहे. या शिक्षिकेला मांजरी येथील केंद्र आले आहे. हे अंतर जवळपास ३० ते ३५ किलोमीटर आहे. भल्या पहाटे घर सोडलेल्या महिलांना एकटेच केंद्रापर्यंत जावे लागणार  आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यांवर  माणसे नसतात, अंधार असतो. अशा स्थितीत रस्ता चुकल्यास  कोणाला पत्ता विचारणार असा प्रश्न आहे. यासोबतच अनेक शिक्षिकांच्या घरी लहान मुले आहेत. त्याचाही विचार करण्यात आलेला दिसत नाही. (प्रतिनिधी)यापूर्वी जर लांबचे मतदान केंद्र मिळाले तर शिक्षक आपापसात सामंजस्याने केंद्राची अदलाबदल करीत असत. मात्र यावेळी त्यालाही नकार देण्यात आल्याने महिलांची अडचण झाली आहे. महिलांच्या बाबतीत हा नियम शिथिल करण्याची मागणी करण्यात येत आहे. आम्हाला काम करायचेच आहे. मतदान केंद्रांवर काम करताना रात्री कितीही उशीर लागला तरी हरकत नाही, परंतु दहा ते बारा किलोमीटरच्या आतील मतदान केंद्र मिळावे, अशी मागणी शिक्षिका करीत आहेत. प्रशासनाने महिलांचे प्रश्न समजूत घेत यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. ४बुथवरील अन्य सहकारी सोबत असतात मात्र, ते प्रत्येक वेळी सोबत असतीलच असे नाही. कारण यावेळी कोणाला कोणते केंद्र मिळणार आहे, याची काहीच शाश्वती नाही. मतदान केंद्रांवर वेळेत रिलीव्हर न मिळाल्याने महिलांना स्वच्छतागृहांमध्येही जात नाही. एखादी वाईट घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.