रहाटणी : महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, सर्वच उमेदवार मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रभाग क्रमांक २७ मधील सर्वसाधारण पुरुष गटातील अपक्ष उमेदवार विनोद तापकीर यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत मतदान करण्याबाबत आवाहन करीत आहेत. या वेळी मतदारांशी संवाद साधताना तापकीर म्हणाले की, मागील ३० वर्षांपासून हा परिसर पालिकेत आहे. मात्र येथील विकास म्हणावा तेवढ्या प्रमाणात झाला नाही. येथील मूलभूत सुविधापासून नागरिक वंचित आहेत. त्यामुळे या प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे गरजेचा आहे. आपले शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असताना आपला प्रभाग मात्र बकाल अवस्थेतच आहे. येथे कोणत्याही पालिकेच्या सोयीसुविधा नाहीत. सुमारे ५० हजार लोकसंख्या असणाऱ्या प्रभागातील नागरिकांची ही परवड आहे. अशा अनेक प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी बॅट चिन्हास मत देऊन काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन तापकीर यांनी केले. (वार्ताहर)
विनोद तापकीर यांनी साधला मतदारांशी संवाद
By admin | Updated: February 17, 2017 04:50 IST