शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची विकासकामे डॅशबोर्डद्वारे होणार ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 03:03 IST

कॅश फ्लो संकल्पना; अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सादर

पिंपरी : महापालिकेचा अर्थसंकल्प २१ फेब्रुवारीला स्थायी समितीला सादर होणार असून, कॅश फ्लो बजेटिंगची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे विकासकामांना ट्रॅक करणारा डॅशबोर्ड महापालिकेने विकसित केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा वास्तववादी असणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२०चा अर्थसंकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात तो प्रशासनाच्या वतीने स्थायी समिती सभेला सादर होईल. गेल्या वर्षी शून्य तरतुदी गायब केल्याने अर्थसंकल्पाचा आकार कमी झाला होता. यंदाच्या अर्थसंकल्पाचे वास्तववादी आणि कॅशफ्लो अर्थसंकल्प असे वैशिष्ट्य असणार आहे.सहा हजार कामे अपूर्ण महापालिकेची प्रलंबित कामे, वित्तीय प्रगतीचा आढावा आम्ही घेतला. त्या वेळी विविध विभागातील सुमारे सहा हजार कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत, अशी माहिती मिळाली. याबाबत सखोल माहिती घेतली असता फायनान्शियल क्लिअरिंग न घेतल्याची सुमारे तीन हजार कामे आढळली. त्यामुळे वित्तीय प्रगतीनुसार कामांची माहिती करून घेण्यासाठी ही नवीन प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे,’’ असे हर्डीकर यांनी सांगितले.भूमी-जिंदगीतही सुसूत्रीकरणमहापालिकेच्या भूमी-जिंदगी विभागातील आपल्या मिळकती, त्यांचा वापर, कालावधी अशी एकत्रित माहिती नव्हती. त्याचे सुसूत्रीकरण करणार आहे. गाळे, इमारती, भाजी मंडई इमारती याची माहिती एकत्रित करून पडून असलेल्या गाळ्याची भाड्याने देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार एससी-एसटी, दिव्यांगांच्या आरक्षणानुसार गाळे आणि ओटे भाड्याने देण्यात येणार आहेत. भूमी-जिंदगी विभागातही सुसूत्रीकरण आणले आहे. त्यातून माहिती संकलित होण्याबरोबरच महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.दर वर्षी विविध विकासकामे आणि योजना आखल्या जातात. आकडे फुगलेले दिसतात. त्याचे अकाउंटिंग केले जाणार आहे. नवीन काम सुरू झाल्यापासून त्याच्या प्रगतीचा वित्तीय प्रगतीनुसार आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित प्रकल्पावर किती खर्च केला, त्या तुलनेत किती काम झाले हे समजणार आहे. यासाठी शहर परिवर्तन कार्यालयामार्फत डॅशबोर्ड तयार केला आहे. त्याची नियमावली तयार केली आहे. या नवीन प्रणालीतून कामाची तपासणी केली जाणार आहे. विकासकामे ट्रॅक केली जाणार आहेत. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड