गहुंजे : सोमाटणे गणातील गावांमध्ये गेल्या पाच वर्षांत भाजपाने विकासकामे केली आहेत. त्यामुळे परिसरात विकासाच्या जोरावर कमळ फुलणार आहे, असा दावा भाजपाचे पंचायत समिती सोमाटणे गणातील उमेदवार उमेश बोडके यांनी सांगितले. बोडके हे सोमाटणे, उर्से, ओझर्डे, आढे शिरगाव, भागात घरोघरी जाऊन थेट संपर्क साधत असून विकासाचे व्हिजन असल्याने भाजपाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. विविध गावातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. उमेदवारांनी युवक, महिलांशी संवाद साधला. बोडके हे गहुंजेचे ग्रामपंचायत सदस्य असून, उपसरपंचपदी काम केले आहे. विविध सरकारी योजना राबविल्या आहेत. या भागाचा कायापालट करण्याचा मानस आहे. महिला, युवक, खेळाडू आदींसाठी विकासाचे व्हिजन राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सडवली, ओझर्डेत फटाके वाजवून व ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. प्रदीप धामणकर, राजेश मुऱ्हे, जालिंदर धामणकर, बाळासाहेब पारखी, शंकर देशमुख, तानाजी कारके, गुलाब घारे, गोविंद बोडके आदी पदयात्रेत सहभागी झाले.
भाजपाच्या माध्यमातून गावांचा विकास
By admin | Updated: February 16, 2017 03:07 IST