शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणाच्या जागा विकसित करणार- महापौर राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:13 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. त्या जागांवर पालिका खेळाचे मैदान, उद्यान विकसित करणार आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. त्या जागांवर पालिका खेळाचे मैदान, उद्यान विकसित करणार आहे. प्राधिकरणाच्या जागा प्राधिकरण देणार असून, गायरान जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणार असून, जागा हस्तांतरणाची प्रक्रिया त्वरित केली जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडील मोकळ्या जागा विकसित करण्यासाठी महापालिकेस हस्तांतरित करण्याबाबत महापौरकक्षात बैठक झाली. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके उपस्थित होते.त्यानंतर महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी बैठकीतील माहिती दिली. महापौर जाधव म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे वाकड, सेक्टर क्रमांक १३, १६, १४ आणि २० यासह विविध भागात मोकळे भूखंड आहेत. त्या जागांचा उपयोग केला जात नाही. त्या जागा महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. त्याचा नागरी सुविधांसाठी उपयोग केला जाईल. त्यावर खेळाचे मैदान, उद्यान विकसित करण्यात येईल. त्याच्यावर पालिकेचा हक्क राहणार आहे. प्राधिकरणाने जागा हस्तांतरित करण्याची तयारी दर्शविली आहे. जागा हस्तांतरणाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. प्राधिकरण प्राधिकरणाच्या जागा देईल आणि गायरान जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणार आहे.’’

याबाबत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘महापालिकेला आपले भूखंड सुरक्षित ठेवता येत नाही आणि आणखी प्राधिकरणाच्या भूखंडांची जबाबदारी घेतली जात आहे. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून अद्यापपर्यंत शंभर टक्के आरक्षणे विकसित करण्यास यश आलेले नाही. त्यामुळे महापालिकेने आपल्या जागा अगोदर सुरक्षित कराव्यात आणि नंतर प्राधिकरणाची जबाबदारी घ्यावी.’’ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौर