शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘एचए’ टिकवून ठेवण्याचा निर्धार

By admin | Updated: December 24, 2016 00:25 IST

केंद्र सरकारने एचए कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी १०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात देण्यासह कंपनीच्या मालकीची ८७ एकर जागा

पिंपरी : केंद्र सरकारने एचए कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी १०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात देण्यासह कंपनीच्या मालकीची ८७ एकर जागा विक्री करण्यास परवानगी दिली आहे. यातून कंपनीला नवसंजीवनी मिळणार ही कामगारांसाठी आनंददायी बाब आहे. मात्र, ही शेवटची संधी मानून कोणत्याही परिस्थितीत कंपनी टिकवून ठेवायची, असा निर्धार हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्सच्या (एचए) कामगारांनी व्यक्त केला आहे. एचए कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीही १३८ कोटींचे पॅकेज दिले होते. मात्र, काही वर्षांतच कंपनी पुन्हा अडचणीत आली. कामगारांचे वेतन थकले. कामगारांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. दरम्यान, आता पुन्हा कंपनीला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. ही शेवटची संधी मानून कामगारही कंपनीच्या उत्पादन वाढीसाठी सज्ज झाले आहेत. वेळ पडल्यास अधिकचे काम करू, सरकारचे उद्दिष्ट पार पाडू, भविष्यात कंपनीवर अशी वेळ येऊ देणार नाही, कंपनी टिकविण्यासाठी आव्हानांचा सामना करू, असा निश्चय कामगारांनी लोकमतच्या व्यासपीठावर केला आहे. दरम्यान, हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनी पुनरुज्जीवनाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कंपनीला नवसंजीवनी मिळावी यासाठी शंभर कोटींचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करीत एचए कामगारांनी गुरुवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण करण्यात आली. ‘कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है’ अशा घोषणा देण्यात आल्या. एचए कंपनीबाबत गेले अनेक वर्षे चर्चा सुरू होती. कंपनी निर्णय होत नसल्याने कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. अनेक कामगारांच्या चुलीही पेटत नव्हत्या. त्यांच्याकडे गॅस सिलिंडर घेण्याएवढे पैसेही नव्हते. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे कामगारांना आनंद झाला आहे. कंपनीतील उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत कामगार वर्गातून व्यक्त होते आहे.