शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू लसीबाबत मधुमेही व रक्तदाबाच्या रुग्णांत उदासीनता

By admin | Updated: January 22, 2016 01:52 IST

राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेतर्फे मधुमेही रुग्ण व रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत स्वाईन फ्लू लसीकरणाची सुविधा १ डिसेंबरपासून चालू करण्यात आली होती

पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेतर्फे मधुमेही रुग्ण व रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत स्वाईन फ्लू लसीकरणाची सुविधा १ डिसेंबरपासून चालू करण्यात आली होती. मात्र त्याला अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाकडून आलेल्या स्वाईन फ्लूच्या लसी पडून असल्याचे चित्र आहे. मधुमेह व उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना स्वाईन फ्लू होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांनी जास्त काळजी घेणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर हा मोफत लसीकरणाचा उपक्रम चालू असून, याला प्रतिसाद नसल्याचे दिसते. डिसेंबरपासून राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा फायदा केवळ १० रुग्णांनी घेतला असून, यामध्ये ६ उच्च रक्तदाबाचे, १ मधुमेहाचा तर ३ जण दोन्ही आजाराचे रुग्ण आहेत. जानेवारीच्या २१ तारखेपर्यंत तर कोणीही लसीकरणाचा फायदा घेतला नाही. साधारणत: जून-जुलै आणि फेब्रुवारी-मार्च यादरम्यान असणारे तापमान स्वाईन फ्लूच्या एच१एन१ या विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे या दरम्यान स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता असते. मधुमेही, रक्तदाब व गर्भवती महिला या आजाराच्या शिकार बनण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, यात आरोग्याच्या प्रश्नांबाबत जागृती नाही की महापालिकेकडून या योजना योग्य पद्धतीने पोहोचत नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र ही उदासीनता आरोग्यावर बेतू शकते, त्यामुळे रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लसीकरण अधिकारी डॉ. कल्पना बळवंत यांनी केले आहे. या लसीमुळे मधुमेह किंवा रक्तदाब झालेल्या रुग्णाची प्रतिकारशक्ती ८ महिने ते १ वर्षापर्यंत टिकू शकते. परंतु लसीकरणानंतर साधारणत: ४ आठवड्यांनी ही प्रतिकारशक्ती तयार होते. ही लस महापालिकेच्या ६ दवाखान्यांमध्ये तसेच ससून जनरल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात मधुमेही व रक्तदाबाच्या रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात येत आहे.