शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मातृभाषेविषयी उदासीनता - उषा तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:20 IST

आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते.

पुणे  - आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते. भाषेचे व्याकरण , शुद्धधीकरण, प्रमाण भाषा, बोलीच का मानायची? अशा चर्चा ऐकायला मिळतात. घरातून बाहेर पडलो की समाजाची भाषा बोलू लागतो. मराठी भाषिकच मातृभाषेविषयी विशेष आग्रही नसतात, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र साहित्य परिषद व जोगळेकर कुटुंबीयांच्या वतीने उषा तांबे यांना डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार देऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग जोगळेकर उपस्थित होते.डॉ. गं.ना जोगळेकर यांच्या नावाने मिळणारा हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे, अशी भावना व्यक्त करून उषा तांबे यांनी जोगळेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कराडला साहित्य संमेलन होते. त्यामधील एका परिसंवादाचे सूत्रसंचालन माझ्याकडे दिले होते. त्या परिसंवादातील एकही वक्ता माझ्या ओळखीचा नव्हता. तेव्हा जोगळेकर यांनी मला विविध ठिकाणाहून आलेल्या सगळ्या वक्त्यांची माहिती दिली. संमेलन म्हणजे टीकेचे धनी होण्याचा कार्यक्रम असतो. पण ते निभावण्याची ताकद त्यांच्यात होती, असे त्या म्हणाल्या.तुम्ही काही चिलखत घालून जाता का संमेलनाला?साहित्य महामंडळात काम करताना अनेक संघर्षाला पदाधिका-यांना तोंड द्यावे लागते. कुठेही काही घडते आणि महामंडळालाच विचारले जाते. मला आई गंमतीने म्हणायची तुम्ही काही चिलखत घालून जाता का संमेलनाला? अशी मिस्किल टिप्पणी करीत संमेलन नवीन लोकांना संधी दिली तर कोण हे? यांना आम्ही ओळ्खतच नाही आणि प्रस्थापित लोकांना बोलावले तर यांच्याशिवाय दुसरे दिसत नाहीत का? असे दोन्ही बाजूने बोलले जाते. संमेलन अखिल भारतीय आहे तर सर्व घटक संस्था सहभागी करून घ्यायला पाहिजेत का नकोत? असा सवालही डॉ. उषा तांबे यांनी केला.

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या