शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू नियंत्रण रॉकेलने धुरकटले

By admin | Updated: November 5, 2014 05:31 IST

गेल्या चार महिन्यांपासून शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. त्यामुळे या डेंग्यूच्या साथीला अटकाव करण्यासाठी महापालिकेकडून शहरात महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने बंदी

पुणे : गेल्या चार महिन्यांपासून शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. त्यामुळे या डेंग्यूच्या साथीला अटकाव करण्यासाठी महापालिकेकडून शहरात महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने बंदी घातलेली असतानाही, धुराळणी पुन्हा एकदा सुरू केली आहे. मात्र, ही फवारणी करताना, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये डिझेल मिसळणे गरजेचे असताना चक्क रॉकेल मिसळले जात आहे. तर, अनेक ठिकाणी केवळ रॉकेलच्याच धुराची फवारणी केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांतून धुराळणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वास्तविक या धुराळणीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातलेली आहे. तरीही डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ही धुराळणी चालू आहे. या धुराळणीच्या वेळी रॉकेलचा वास येत असल्याची तक्रार काही नागरिकांनी ‘लोकमत’कडे केली होती. त्यानुसार ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शहरात पाहणी केली. काही ठिकाणी धुराळणीसाठी फक्त रॉकेलचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे ही कबुली एका औषध फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच चक्क याची कबुली शहरातील एका डॉक्टरांकडे दिली आहे. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल ३ हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे महापालिकेकडून शहरात मिशन फाईव्ह डे हा उपक्रम घेण्यात आला आहे. तसेच, शहरात सर्वत्र धूर फवारणी आणि औषध फवारणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने ३०० हून अधिक मशिनही भाडेकराराने खरेदी केलेल्या आहेत. मात्र, धुराळणीसाठी मिसळल्या जाणाऱ्या औषधाचे प्रमाणही इतके नगण्य आहे, की फवारणीनंतर केवळ रॉकेलचाच घमघमाट पसरत असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)