शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वीस दिवसांत ५३ जणांना डेंगी, आरोग्य विभागाची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:17 IST

डेंगीच्या रुग्णांत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरामधील वाढत्या अस्वच्छतेमुळे कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पिंपरी : शहरामध्ये ताप, सर्दी, खोकला अशा आजारांनी शहरवासीय त्रस्त आहेत. त्यामध्ये डेंगीच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर महिन्यांच्या २० दिवसांमध्ये ३३३ संशयित रुग्णांपैकी ५३ रुग्णांना डेंगीची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दर महिन्याला डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

डेंगीच्या रुग्णांत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरामधील वाढत्या अस्वच्छतेमुळे कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ४५७० तापाचे रुग्ण आढळले. यामध्ये ८५९ संशयित रुग्णांपैकी २१८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर जानेवारी महिन्यांपासून आतापर्यंत ५६३ रुग्णांना डेंगीची लागण झाली आहे. शहरातील वाढत्या अस्वच्छतेने कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.नागरिकांनी घ्यावी काळजीशहरात विविध ठिकाणी तपासणी सुरू असून डेंगी प्रतिबंधात्मक उपाय सुरू आहेत. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdengueडेंग्यू