लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : येथील पेठ क्रमांक २२ मध्ये महापालिकेचे यमुनानगर रुग्णालय असून निगडी, साईनाथनगर, यमुनानगर, रुपीनगर परिसरातील नागरिक येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात महिलांसाठी प्रसूतिगृह, क्षयरोग निदान केंद्र त्याचबरोबर छोट्या आजारांवर उपचार केले जातात. परंतु पेठ क्रमांक २२ मधील सर्वच नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे रात्री-अपरात्री अपघाती रुग्ण किंवा गंभीर आजारी रुग्णांना पिंपरी येथील कै. यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथे घेऊन जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे यमुनानगर रुग्णालयात अतिदक्षता विभाग व २४ तास तातडीक सेवा सुरू करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.
अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी
By admin | Updated: June 30, 2017 03:48 IST