शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

देहूरोडला दोन्ही भुयारी मार्ग वापराविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:49 IST

पुणे-मुंबई महामार्ग : सेवा रस्त्यासाठी संरक्षण विभागाकडून जागा मिळेना

देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर देहूरोड ते निगडी दरम्यान नागरिकांच्या सोईसाठी विविध तीन ठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या तीन भुयारी मार्गांपैकी देहूरोड येथील आयुध निर्माणी, तसेच केंद्रीय विद्यालय येथील दोन भुयारी मार्गांचे बांधकाम सुमारे पाच महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र रस्तेविकास महामंडळामार्फत दोन्ही ठिकाणी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गास जोडणाºया सेवा रस्त्यासाठी हवी असणारी जागा संरक्षण विभागाकडून उपलब्ध झाली नसल्याने भुयारी मार्गांचा वापर आयुध निर्माणीतील कामगार, वसाहतीत राहणारे नागरिक, विद्यार्थी, तसेच हलक्या मोटारी, रिक्षा व दुचाकी यांना करता येत नाही. परिणामी सर्वांना जीव धोक्यात घालून दररोज महामार्गावरून ये-जा करावी लागत आहे.

पुणे-मुंबई महामार्गाचे देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करताना रस्ते विकास महामंडळाने स्थानिक नागरिक, वाहनचालक यांच्या सुरक्षेसाठी व महामार्गावर वाहतूक सुरळीत राहावी म्हणून देहूरोड परिसरात तीन ठिकाणी मोटारी, रिक्षा व दुचाकी तसेच पादचारी यांना ये-जा करण्यासाठी आयुध निर्माणी, केंद्रीय विद्यालय क्रमांक एक व देहू दारूगोळा कोठाराजवळ (एफएडी - बी सब डेपो) अशा तीन ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्याचे निश्चित झाले होते. त्यांपैकी आयुध निर्माणी प्रवेशद्वार व केंद्रीय विद्यालयाजवळ तीन-तीन मीटर रुंदीचे दोन भुयारी मार्ग बांधकाम पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे, तर दारुगोळा कोठाराजवळ बांधण्यात येणाºया भुयारी मार्गाची जागा बदलण्यात आली असून, नवीन ठिकाण अद्याप निश्चित झाले नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, देहूरोड येथील संरक्षण विभागाच्या आयुध निर्माणी व केंद्रीय विद्यालयाजवळ बांधण्यात आलेल्या दोन्ही भुयारी मार्गांना व महामार्गाला जोडणाºया सेवा रस्त्यासाठी रस्ते विकास महामंडळाने केंद्रीय संरक्षण विभागाकडे जागेची मागणी केली आहे. मात्र संबंधित विभागाने जागेच्या मोबदल्यापोटी २४ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळानेही याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. परिणामी दोन्ही भुयारी मार्ग बांधून तयार आहेत. मात्र समन्वयाच्या अभावाने स्थानिक वाहनचालक , कामगार, नागरिक व विद्यार्थी यांना दररोज जीव धोक्यात घालून महामार्गावरूनच ये-जा करावी लागत असून, सेवा रस्त्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.महामार्ग चौपदरीकरण करताना देहूरोड परिसरातील नागरीकरण व विविध लष्करी आस्थापना यांचा विचार करून सर्वांच्या सहमतीने आयुध निर्माणी व केंद्रीय विद्यालय येथे भुयारी मार्ग बांधण्यात आले असून फक्त सेवा रस्त्याचे काम रखडलेले आहे. मात्र सेवा रस्ता बांधकामासाठी हवी असणारी लगतची जागा ही संरक्षण विभागाची असून त्यांच्याकडे रितसर जागा मागणीचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र त्यांच्याकडून दोन्ही ठिकाणच्या जागेच्या मोबदल्यापोटी २४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सेवा रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत पदाधिकाºयांना अहवाल देण्यात आलेला आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतर सेवा रस्त्याचे काम मार्गी लागू शकते.- संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड