शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची मतदार संख्या घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 19:18 IST

गेल्या वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत सात वॉर्डांत एकूण मतदार संख्या ३६ हजार ३७ इतकी होती. यात १८ हजार ७२८ पुरुष मतदार व १७ हजार ३०९ स्त्री मतदार होते.

ठळक मुद्देसात प्रभागांतील मतदारयादी तयार करणेसाठी शिक्षक प्रगणकांची नेमणूक

देहूरोडदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची सन २०१८ची अंतिम मतदारयादी शनिवारी (दि.१५) प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंटच्या सात वॉर्डात ३२ हजार ४२५ मतदार असून वॉर्ड क्रमांक चारमध्ये सर्वाधिक ६ हजार ५७४ मतदार आहेत. तर वॉर्ड क्रमांक सातमध्ये सर्वात कमी ३ हजार १८५ मतदार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मतदार संख्या ३ हजार ६१२ ने घटली आहे. नागरिकांना मतदारयादी पाहण्यासाठी बोर्डाच्या  कार्यालयात उपलब्ध असल्याचे कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी सांगितले. देहूरोड कॅन्टोनमेंटने १९ एप्रिल २०१७ पासून हद्दीतील सात प्रभागांतील मतदारयादी तयार करणेसाठी शिक्षक प्रगणकांची नेमणूक केली होती. या प्रगणकांनी मतदारांच्या घरोघरी प्रत्यक्ष जाऊन कॅन्टोन्मेन्ट निवडणूक नियमानुसार बोर्डाने दिलेला ठराविक नमुन्यातील अर्ज प्रत्येक कुटुंबप्रमुखाकडून सहीनिशी भरून घेण्यात आला होता. १ मार्च २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण असणाऱ्या व बोर्ड हद्दीत राहणाऱ्यांची नावे मतदार यादीत समविष्ट करण्यात आली आहेत. मतदार यादी बनविताना व्यक्तीचे नाव, वय, पूर्ण पत्ता, ( घर क्रमांकासह ) ,अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती याबाबत माहिती घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते.  कॅन्टोन्मेंट निवडणूक म नियम १७ अन्वये शनिवारी १५ प्टेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून १६ हजार ७१६ पुरुष मतदार असून १५ हजार ७०९ स्त्री मतदार आहेत. मतदारयादी मराठी व इंग्रजी भाषेत बनविण्यात आली आहे.  मतदार संख्या ३ हजार ६१२ ने  घटली :  मतदार गेले कोठे ? गेल्या वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत सात वॉर्डांत एकूण मतदार संख्या ३६ हजार ३७ इतकी होती. यात १८ हजार ७२८ पुरुष मतदार व १७ हजार ३०९ स्त्री मतदार होते. मात्र शनिवारी झालेल्या मतदारयादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २ हजार १२ पुरुष मतदार व एक हजार ६०० स्त्री मतदार असे एकूण ३ हजार ६१२ मतदार कमी झाले आहेत. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असताना मतदार संख्या वाढण्याऐवजी अचानक एवढे मतदार कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.                                 वॉर्डनिहाय अंतिम मतदार २०१८ 

प्रभाग क्रमांक एक -  ४४०१                          

प्रभाग क्रमांक दोन -  ५२३७                                      

प्रभाग क्रमांक तीन - ४१०५                            

प्रभाग क्रमांक चार  -  ६५७४                                   

प्रभाग क्रमांक पाच  - ४३५७                                       

प्रभाग क्रमांक सहा   -४५६६                                       

प्रभाग क्रमांक सात   - ३१८५                                     

एकूण मतदारसंख्या  - ३२४२५  

टॅग्स :dehuroadदेहूरोडElectionनिवडणूक