शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नात घट; तरीही होऊ दे खर्च!

By admin | Updated: January 7, 2016 01:33 IST

जकात बंद झाल्यानंतर सुरू करण्यात आलेली एलबीटीही बंद करण्यात आली. त्या बदल्यात शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानातही कपात करण्यात आली.

पिंपरी : जकात बंद झाल्यानंतर सुरू करण्यात आलेली एलबीटीही बंद करण्यात आली. त्या बदल्यात शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानातही कपात करण्यात आली. यामुळे उत्पन्नात फटका बसत असतानाही महापालिकेकडून मात्र ‘होऊ दे खर्च’ असाच सिलसिला सुरू आहे. अनावश्यक प्रकल्पांवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. शहरात मोठमोठे उद्योग असल्याने जकातही मोठ्या प्रमाणात मिळत होती. यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक हातभार लागत होता. यामुळे महापालिकेसाठी जकात हा उत्पन्नाचा मोठा स्रोत समजला जात होता. जकात उत्पन्नाच्या जोरावर महापालिकादेखील मोठमोठे प्रकल्प हाती घेत होती. मात्र, जकात बंद केल्यानंतर महापालिका आर्थिक अडचणीत सापडली. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या एलबीटीतून समाधानकारक उत्पन्न मिळत होते. दरम्यान, एलबीटी बंद करण्यात आल्याने त्या बदल्यात शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानातही कपात झाली. दरमहा मिळणारे ६६ कोटींचे अनुदान ४७ कोटींवर आले. यासह शास्ती कराची अडीचशे कोटींची थकबाकी आहे. तर, पाणीबिलाची चाळीस कोटींची थकबाकी वसुली झालेली नाही. या थकबाकी वसुलीचे महापालिकेपुढे आव्हान आहे. अशा प्रकारे महापालिकेच्या उत्पन्नाला फटका बसत असताना उपलब्ध पैशांचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. तिजोरीत पैशांची कमतरता असतानाही विश्वस्त समजले जाणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या खर्चाचे प्रकल्प राबविण्याची स्वप्ने पाहत आहेत. दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पवनाथडी जत्रेवर सुमारे अर्धा कोटी रुपये खर्च केले जातात. मात्र, या जत्रेचा महिला बचत गटांना व शहरवासीयांना कितपत फायदा होतो, हे तपासणेदेखील गरजेचे आहे. शहरवासीयांपेक्षा मंडप ठेकेदाराचा मात्र शाश्वत फायदा होत असतो. यामध्ये निव्वळ मंडप उभारणीवरच पंचवीस लाखांपर्यंत खर्च होतो. महापालिकेच्या विविध कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिका छापल्या जातात. मात्र, या पत्रिका छापताना नेहमीच तातडीची बाब म्हणून त्यासाठी हवा तितका खर्च करण्याची पद्धती रूढ झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या प्रकल्पांवर महापालिकाच उधळपट्टी करत आहे.