शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळामध्ये घोषणा; तरीही फिरणार बुलडोझर

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत विधानसभेत घोषणा झालेली आहे. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच कारवाई थांबविण्याबाबत शासनाकडूनही अद्याप

पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत विधानसभेत घोषणा झालेली आहे. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच कारवाई थांबविण्याबाबत शासनाकडूनही अद्याप आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरुच राहणार असल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अनेक वर्षांपासून लटकलेला आहे. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची घोषणा विधानसभेत केली. या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या घोषणेमुळे अनधिकृत बांधकामधारकांना दिलासा मिळाला असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे शहरातील हजारो अनधिकृत बांधकामधारकांना अभय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे हा प्रश्न मार्गी लावण्यावरुनही श्रेयवादाची लढाईदेखील सुरु झाली आहे. महापालिका हद्दीत एकूण चार लाख २६ हजार २४१ मिळकती असून त्यापैकी २००८ नंतरची अनधिकृत बांधकामे ६५ हजार ६०६ आहेत. अनधिकृत बांधकामे केल्याप्रकरणी दोन हजार २८४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर २ हजार २८६ बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. यासह ३५ हजार बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तसेच कारवाई थांबविण्याबाबत शासनाकडून आदेश अद्याप प्राप्त न झाल्याने कारवाई सुरुच राहणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना दिलासा मिळणार की कारवाईला सामोरे जावे लागणार याबाबत अजूनही नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. नक्की काय होणार याबाबत नागरिक एकमेकांकडे चौकशी करीत असून कारवाईच्या भितीने अजूनही भितीच्या सावटाखाली आहे. अनधिकृत बांधकामांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडेही लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)