शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेटवलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारदरम्यान मृत्यू

By admin | Updated: March 9, 2017 16:08 IST

पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा गुरुवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला

नातेवाईकच संशयित आरोपी, गुन्हा दाखल 
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि, ९ -  पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या उद्धव आसाराम उनवणे (वय ६५, रा. आळंदी, मूळ रा. नाशिक) या ज्येष्ठ नागरिकाचा गुरुवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नी, जावयासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
नाशिकवरुन पैसे घेऊन उनवणे बुधवारी वल्लभनगर बस स्थानकात आले होते. उद्धव उनवणे (वय ६५) हे मूळचे नाशिकचे परंतू आळंदीत राहत होते. आळंदीतील घराचे भाडे थकले होते. ही भाड्याची रक्कम घेऊन ते नाशिकहून वल्लनभनगरला आले. वल्लभनगर स्थानकातून ते कासारवाडी नाशिक फाट्याकडे जात होते. त्यावेळी तिघांनी त्यांचा पाठलाग केला. तुम्ही उनवणे  आहात काय ? अशी विचारणा केली. तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्याकडील २० हजार रूपयाची रोकड काढून घेतली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविले. त्यामध्ये ते गंभीररित्या भाजले. पेटवून दिल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले होते. रस्त्याने जाणाºया काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी तक्रार घेण्यास दिरंगाई केली. आत्महत्येचा प्रयत्न असावा, असा अंदाज बांधत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतू वयोवृद्ध गृहस्थ गंभीर भाजला असल्याने फिर्याद दाखल करावी. अशी मागणी केल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली. या प्रकरणी फिर्याद दाखल करताना पत्नी सुमन,जावई ज्ञानेश्वर जयंत महाले यांच्याहसह अन्य तिघांविरोधात संशय व्यकत केला होता. भाजलेल्या उनवणे यांना वायसीएम रूग्णालयात  उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोसरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.