शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विधीमंडळातील ठराव पवित्र असतो: देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2023 23:02 IST

झिझिया करातून मुक्तता

लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी - मुघलांच्या काळात जसा झिझिया कर होता तसा शास्ती कर पिंपरी चिंचवड शहरामध्ये होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी तो लावला. भाजपचे सरकार आल्यानंतर 1000 चौरस फूट बांधकामांचा शास्तीकर रद्द केला. आता आम्ही सरसकट माफी केली. त्याचा शासन आदेश लवकरच निघेल. विधीमंडळात झालेला निर्णय पवित्र असतो.  आचारसंहिता संपल्यानंतर हा शासन आदेश निघेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चिंचवड पोटनिवडणूकीसाठी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रांतध्यक्षा चित्रा वाघ, खासदार धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, महेश लांडगे, उमा खापरे, प्रा. राम शिंदे आदि उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, चिंचवडची ही निवडणूक अचानक आली.  आपल्याला कल्पना न्हवती. मात्र लक्ष्मण जगताप यांचे कार्य पुढे नेले पाहिजे. त्यासाठी अश्विनी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. शहरातील नागरिकांसाठी सरसकट शास्तीकर माफीचा निर्णय झाला आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची मोठी गरज आहे. 250 एमएलडी पाणी आंद्रा धरणातून आणले आहे ते पुढील दोन महिन्यात शहराला मिळेल.  पंतप्रधान मोदी करोडो रुपये शहरीकरणासाठी देत आहेत. कारण शहर संधी निर्माण करतात. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शहरे बकाल केली. मात्र मोदी आता परिवर्तन करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण