शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दादागिरीमुळे उद्योजक मेटाकुटीला

By admin | Updated: March 23, 2016 00:57 IST

औद्योगिक परिसरातील गुंडगिरी, चोऱ्या, कामगारांच्या लूटमारीमुळे उद्योजक वैतागले आहेत. दुसरीकडे माथाडी संघटनांची दादागिरी वाढतच चालली आहे.

भोसरी : औद्योगिक परिसरातील गुंडगिरी, चोऱ्या, कामगारांच्या लूटमारीमुळे उद्योजक वैतागले आहेत. दुसरीकडे माथाडी संघटनांची दादागिरी वाढतच चालली आहे. उद्योग सोडून या अपप्रवृत्तीशी सामना करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी वाढली आहे. निशस्त्र सुरक्षारक्षकाला धमकावून कंपनीतून साहित्य आणि कच्च्या मालाची चोरी हे प्रकार नित्याचे झाले आहेत. परिसरात ये-जा करणाऱ्या कामगारांवर हल्ला करून, त्यांची लूट करण्याच्या घटना नेहमीच घटत असतात. रोडरोमिओंकडून होणाऱ्या छेडछाडीमुळे महिला कर्मचारी त्रस्त आहेत. औद्योगिक परिसरात गस्त घालण्यासाठी लघुउद्योग संघटनेने टार्क्स फोर्ससाठी २ मोटारींची व्यवस्था केली होती. सहा महिने ही योजना सुरळीत सुरू होती. पुढे ती टार्क्स फोर्सची गस्त बंद झाली. पोलीस कमांडोही फिरकत नाहीत. त्यानंतर चोरीचे प्रमाण पुन्हा वाढले. चोऱ्या करणारे टोळके परिसरात फिरत असल्याचे सांगूनही पोलीस दुर्लक्ष करतात. ते येईपर्यंत टोळके पसार झालेले असते. या टोळ्यांना पोलिसांची फूस असल्याचे उघड सत्य आहे. औद्योगिक परिसरात क्रेनच्या माध्यमातून साहित्याची चढ-उतार केली जाते. त्यामुळे माथाडींची गरज भासत नाही. तरीही, दादागिरी करीत माथाडी संघटनांतर्फे ठेका देण्याची आग्रही मागणी केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जातो. त्यामुळे उद्योजक त्रस्त आहेत. या संदर्भात पोलीस यंत्रणेकडे वारंवार तक्रारी करूनही माथाडी कायद्यामुळे ते दखल घेत नाहीत. शहरात सर्वाधिक उद्योग आहेत. मात्र, परवाने, सेवा व विक्री कर, कामगार उपायुक्त कार्यालय, औद्योगिक न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग केंद्र, एमआयडीसी आदी महत्त्वाची शासकीय कार्यालये पुणे शहरात आहेत. यामुळे उद्योजकांना वारंवार पुण्यात चकरा माराव्या लागतात. ही सर्व कार्यालये शहरात सुरू करून एक खिडकी योजनाद्वारे या कामासाठी ठरावीक मुदत असावी, ही उद्योजकांची मागणी प्रलंबित आहे. चिंचवड येथे ईएसआय रुग्णालयात डॉक्टर, पुरेसा औषधसाठा अशा वैद्यकीय सेवा अपुऱ्या असल्याने कामगारांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. ईपीएफचा निधी भरूनही चांगले उपचार मिळत नसल्याने कामगारवर्गाची गैरसोय होते.उद्योगासाठी बॅँक कर्जाचा व्याजदर अधिक असल्याने उद्योजकांची, विशेषत: मध्यम व लघुउद्योजकांची आर्थिक कोंडी होते. एमआयडीसीकडून फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार उद्योगाची नोंदणी केली जाते. असे असताना पुन्हा महापालिकेकडे उद्योगधंदा परवाना दाखला घ्यावा लागतो. या सक्तीमुळे उद्योजक हैराण आहेत. (वार्ताहर)