शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दापोडीतील आई उद्यानाची दुरवस्था

By admin | Updated: June 2, 2017 02:21 IST

दापोडीतील गणेशनगर येथील महापालिकेच्या आई उद्यानातील करपलेली झाडे, प्रवेशद्वाराचे रखडलेले काम, तुटलेली खेळणी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : दापोडीतील गणेशनगर येथील महापालिकेच्या आई उद्यानातील करपलेली झाडे, प्रवेशद्वाराचे रखडलेले काम, तुटलेली खेळणी, उघडा डीपी बॉक्स, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, टवाळखोरांचा त्रास आदींमुळे उद्यानाला उतरती कळा आली आहे.महापालिकेच्या प्रशस्त तीन एकर जागेत आई उद्यान साकारले आहे. या उद्यानात तीन सुरक्षारक्षक, तीन महिला व दोन षुरुष कामगार कार्यरत आहेत. उद्यानात एकच विंधन विहीर व अपुऱ्या पाणीपुरठ्यांमुळे उद्यानातील विविध प्रकारची झाडे करपून चालली आहेत. त्यामध्ये विविध फुलझाडे, डुरांडा, सायप्रस, विविध शोभेच्या झाडांचा समावेश आहे. तसेच लॉन सुकलेले आहे. चार महिन्यांपासून प्रवेशद्वाराचे काम अर्धवट स्थितीत रखडले आहे. उद्यानातील खेळणी (झोका) तुटलेला आहे. मुलांच्या संख्येच्या प्रमाणात अपुरी खेळणी आहेत. उद्यानात उघडा डीपी बॉक्स आहे. त्यामुळे अपघाताचा धोका नाकारता येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी एक सिमेंटची टाकी आहे. तीही धुतली नसल्याने पाणी भरलेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.असुविधांचे आगारप्रवेशद्वाराचे काम रखडल्यामुळे बाजूचा परिसर खुला असल्यामुळे टवाळखोरांचा त्रास वाढत आहे. सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्यामुळे टवाळखोर भिंतीवरून ये-जा करतात. मद्यपान करणाऱ्या दारूड्यांचा वावर वाढला आहे. आईची मूर्ती बसविण्यासाठी गोलाई बनवली आहे. त्यामध्ये वारूळ बनले आहे. तसेच येथील खेळण्यांची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. डीपी बॉक्स नेहमी उघडाच असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.वाढत्या लोकसंख्येच्या मानाने उद्यानात अपुऱ्या सोयी आहेत. यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानाची दुरवस्था पाहवी. त्यामुळे बालचमू व ज्येष्ठ नागरिकांची हिरेमूड होत आहे. उद्यानात गेल्यानंतर सुकलेली झाडे पाहवी लागतात.- माई काटे, नगरसेविकाप्रवेशद्वाराचे काम रखडल्यामुळे खुल्या जागेतून ये-जा करणाऱ्या टवाळखोरांचा त्रास वाढला आहे. रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांचा वावर वाढला आहे. सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्याने टवाळखोर भिंतीवरून ये-जा करतात. आम्ही सुरक्षारक्षक असल्याने दाद दिली जात नाही. आम्हाला टवाळखोरांकडून दमदाटी होते. - सुशील गायकवाड, सुरक्षारक्षक वारंवार लेखी निवेदने देऊनही उद्यान विभागाने दखल घेतली नाही. उद्यानासाठी टेंडर नसल्याचे वारंवार सांगण्यात येते. गेली एक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. उद्यान विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याने सर्व नगरसेवक आंदोलन करणार आहोत.- रोहित काटे, नगरसेवक