पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला मंगळवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात मागील पावसाळ्यात केवळ ८० टक्के पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे ९ डिसेंबर २०१५ला शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. त्यानंतर ११ मार्च २०१६ मध्ये १० टक्क्यांवरून ही पाणीकपात १५ टक्क्यांवर नेण्यात आली होती. धरणातील पाणीसाठा घटत असल्याने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिन्याभरापूर्वीच नमूद केले होते. त्यानुसार महापालिकेकडून पाणीपुरवठ्याच्या कपातीचे नियोजन करण्यात आले. सध्या धरणात २.१९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यामुळे येत्या मंगळवारपासून महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, दिवसाआड ठरवून दिलेल्या वेळेमध्ये पाणीपुरवठा होणार आहे. (प्रतिनिधी)पाण्याची कमतरता असताना शहरात सर्रासपणे वॉशिंग सेंटरवर पाण्याचा अपव्यय होत असून, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. याबाबत आयुक्त राजीव जाधव म्हणाले की, वॉशिंग सेंटरवर पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणे योग्य नाही. हे प्रकार रोखण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी वॉशिंग सेंटरवर जाऊन सेंटरचालकांना पाण्याच्या वापराबाबत सूचना देण्याबाबत सांगण्यात आले आहे. पाणीपुरवठा वेळापत्रक‘अ’ क्षेत्रीय कार्यालयमंगळवारपासून दिवसाआड सकाळी पाणीपुरवठा होणारा परिसर - बापदेवनगर ते श्रीनगर, दत्तनगर, आदर्शनगर, किवळे गावठाण, माळवळे वस्ती, कोतवालनगर, कातळेवस्ती, भारतरत्न सोसायटी, विकासनगर, दांगटवस्ती, पेंडसे कॉलनी, शिंदे पेट्रोल पंप, मीना कॉलनी, शेळकेवस्ती, तुपे वस्ती, सेक्टर क्रमांक २४, २५, २६, २७, २७अ, २८, आकुर्डीतील गंगानगर, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, एकतानगर, प्रभाग क्रमांक २५ आनंदनगर, एम्पायर इस्टेट, मोरवाडी न्यायालय परिसर, अमृतेश्वर सोसायटी परिसर. बुधवारपासून दिवसाआड सकाळी पाणीपुरवठा होणारा परिसर- मामुर्डी प्रभाग क्रमांक १८, रावेत गावठाण, म्हस्केवस्ती, भोंडवेस्ती, सेक्टर क्रमांक २३, २६ साईनाथनगर, सिद्धीविनायकनगरी, श्रीनगरी, आशीर्वाद सोसायटी, मोहननगर, चिंचवड स्टेशन, आॅटो क्लस्टर, फुलेनगर झोपडपट्टी, मोरवाडी श्रद्धा रिजन्सी सोसायटी परिसर.‘ब’ व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयमंगळवारपासून नेहमीच्या वेळेनुसार दिवसाआड पाणीपुरवठा होणारा परिसर - शिंदेवस्ती परिसर, नवशांती निकेतन, इस्कॉन मंदिर परिसर, गुरुद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी, जय मल्हार कॉलनी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, रस्टन कॉलनी, पवनानगर, जुना जकात नाका परिसर, विजयनगर झोपडपट्टी, वेताळनगर, मोरयानगर झोपडपट्टी, शिवनगरी, बलवंतनगर, चिंतामणी मंदिर परिसर, रजनीगंधा सोसायटी, भोंडवेवस्ती, उद्योगनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, संतोषनगर, पुनावळे गावठाण, कायतेवस्ती, काटेवस्ती, माळवाडी परिसर, ताथवडे गावठाण, काळाखडक झोपडपट्टी, स्वामी विवेकानंदनगर, विनोदेवस्ती, वाकड, भुमकरवस्ती, भुजबळवस्ती, वाकड गावठाण, म्हातोबानगर झोपडपट्टी, शेखवस्ती, कलाटेनगर, बालेवाडी क्रीडासंकुल, कस्पटेवस्ती, विशालनगर, जगताप डेअरी, शास्त्रीनगर, रहाटणी गावठाण, रामनगर, पिंपळे निलख गावठाण, श्रीनगर परिसर, थेरगाव, गुजरनगर, कावेरीनगर, १६ नंबर परिसर, पडवळनगर, सुंदर कॉलनी, पवार गल्ली, थेरगाव गणेशनगर, शिवकॉलनी, मंगलनगर परिसर, वेणुनगर, विजयनगर, थेरगाव गावठाण, तापकीरनगर, काळेवाडी, नढेनगर, पंचनाथ कॉलनी, दत्तनगर परिसर, सदाशिव कॉलनी, अशोका सोसायटी, जय मल्हारनगर. बुधवारपासून नेहमीच्या वेळेनुसार दिवसाआड पाणीपुरवठा होणारा परिसर - चिंचवडगाव, मोरया गोसावी मंदिर परिसर, धनेश्वर मंदिर परिसर, भाजी मंडई परिसर, गणेश मंदिर परिसर, केशवनगर, दर्शननगरी, भीमनगर, तानाजीनगर, शिवाजी उदय मंडळ परिसर, श्रीधरनगर, सुदर्शननगर, भोईर कॉलनी, लिंकरोड परिसर, भाटनगर, अशोकनगर, बौद्धनगर, पिंपरीनगर, शगुन चौक, पिंपरी गावठाण, मिलिंदनगर, बलदेवनगर, शास्त्रीनगर, वैष्णोदेवी मंदिर परिसर, सुभाषनगर, जिजामाता रुग्णालय परिसर, तपोवन मंदिर रोड परिसर, वाघेरे कॉलनी, माळी आळी.क क्षेत्रीय कार्यालय दिवसाआड पाणीपुरवठा होणारा परिसर - वल्लभनगर, गंगानगर, संत तुकारामनगर, महेशनगर, नेहरुनगर, गवळीमाथा (गुलाबपुष्प उद्यानासमोर), कासारवाडी रेल्वे गेट परिसर, शंकरवाडी, वैशालीनगर, विशाल थिएटर, एस. आर. ए. प्रकल्प, खराळवाडी, गांधीनगर, नाणेकरचाळ, गुरुदत्तनगर, गोकुळ हॉटेल, फुगेवाडी, साहिल सोसायटी (सकाळ), कोहिनूर टॉवर, महात्मा फुलेनगर, यशवंतनगर, कोहिनूर वायोना (दुपार), उद्यमनगर, कासारवाडी रेल्वे गेटावरील परिसर, श्याम लांडे परिसर, कुंदननगर, नेहरुनगर, मनपा गोडाऊन, विठ्ठलनगर (संध्याकाळ), स्वरगंगा, म्हाडा सोसायटी (रात्री). ई क्षेत्रीय कार्यालय मंगळवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणारा परिसर- गायकवाड वस्ती, नागेश्वर नगर, इंद्रायणी पार्क, गणेशनगर, नंदनवन, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर, बनकर वस्ती, सस्तेवाडी, आल्हाटवस्ती, मोशी गावठाण, शिवाजीवाडी, नागेश्वर विद्यालयामागील परिसर, शिवाजीवाडी जकातनाका परिसर, देहू रस्ता डावी बाजू, देहू रस्ता उजवी बाडू, आदर्शनगर कचरा डेपो, आदर्शनगर पेट्रोल पंपामागे, संत तुकारामनगर कचरा डेपो, वाघेश्वरनगर व बनकर वस्ती, अशोकनगर, विनायकनगर, संजय गांधीनगर, बोराटेवस्ती, नाशिकरोड, टेकाळेवस्ती, भोसरी गावठाण, शीतलबाग, लोंढे तालीम, विकास कॉलनी, लांडगेवाडी, माळी गल्ली, मदने निवास, सेक्टर ४, ६ व ९, तापकीरनगर, गंधर्वनगरी, खांदेशनगर, गणेश साम्राज्य व परिसर, कोतवालवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, साठेनगर, पाटोळेवस्ती, भोसले वस्ती, आझादनगर, चोविसावाडी, वडमुखवाडी, तापकीरवस्ती, शिवनगरी, जगताप वस्ती, कानिफनाथ गल्ली, पद्मावतीनगर, काळीभिंत, दत्तनगर, दिघी मॅगझिन, मोझे शाळा, साईनगरी, साईमंदिर परिसर, लक्ष्मी नारायणनगर, ताजणेमळा, पठारे कॉलनी, चऱ्होली गावठाण, भोसलेवस्ती, वाघेश्वरनगर बुरुडेवस्ती, माटेवस्ती, ताजणेवस्ती, रासकर सरपंच मळा, काटेवस्ती, दाभाडेवस्ती, दिघी गावठाण, विजयनगर, चौधरी पार्क, रुणवाल पार्क, काटेवस्ती, मंजुरीबाई शाळा परिसर, भारतमातानगर गणेश कॉलनी १ ते ४, हनुमान कॉलनी नं. १व२, सहकार कॉलनी १ व २, कृष्णानगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर पार्क, शिवनगरी, सावंतनगर, महादेवनगर, साईपार्क, पारांडेनगर, दत्तगडनगर, आदर्शनगर, शिवनगरी, सह्याद्री कॉलनी. बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणारा परिसर गुळवेवस्ती, भगतवस्ती, शांतीनगर काही भाग, इंद्रायणीनगर, महाराष्ट्र कॉलनी, बालाजीनगर, सेक्टर ३, ७ व १०, दत्तनगर, गजानन महाराजनगर, श्रीराम कॉलनी, गणेशनगर, खंडोबा माळ, आपटे कॉलनी, नवग्रह मंदिर, दिघी रोड, गवळीनगर, राधानगरी, पांजरपोळ, पांडवनगर, सहकार कॉलनी, शिवशंकर, देवकरवस्ती, महादेवनगर, गुरुविहार सोसायटी, सदगुरुनगर, अक्षयनगर, आनंदनगर, बोपखेल , सँडविक कॉलनी, गुरुकृपा कॉलनी.
मंगळवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा
By admin | Updated: May 1, 2016 03:00 IST