पिंपरी : प्रचाराची एकही संधी न दवडणाऱ्या इच्छुकांकडून साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याचेही सोने करण्याचा प्रयत्न मंगळवारी केला. अनेक इच्छुकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांच्या दारावर धडक मारल्याची दिसून आले. महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून इच्छुकांच्या प्रचाराला वेग आला आहे. सोडतीनंतर आपणच ‘फिक्स’ असल्याची खात्री झाल्यावर दसऱ्याच्या मुहूर्तावर भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. विविध भागांत इच्छुकांकडून दस-याच्या शुभेच्छा देणारी पत्रके छापून कार्यकर्त्यांकरवी लोकांच्या हाती दिली जात आहेत.नवरात्रीमध्ये घेतलेल्या स्पर्धांवर दसऱ्याच्या मुहूर्तावर बक्षिसांची खैरात केली आहे. चांदीची भांडी, एलसीडी टीव्ही, महिलांसाठी दुचाकी अशा बक्षिसांचे वाटप करून मतदार आकर्षित करण्याचा प्रयत्न शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
दसऱ्याच्या संधीचे इच्छुकांकडून सोने
By admin | Updated: October 13, 2016 02:08 IST