शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचा स्फोट; चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:17 IST

गॅस गळती होऊन घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी नेहरुनगरात घडली.

पिंपरी - गॅस गळती होऊन घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी नेहरुनगरात घडली. यामध्ये चौघे जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. स्फोटात घराचे पत्रे उडून गेले आहेत.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दुर्गेश सिंग (वय १२), शिवा सिंग (वय १०) हे दोघे साठ टक्के भाजले आहेत, तर संदीप सिंग (वय २१), लबलादेवी सिंग (वय ३२) यांचा समावेश आहे. संदीप आणि लबालादेवी हे दोघे झळांमुळे किरकोळ जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.संदीप सिंग नेहरूनगरात राहतात. सकाळी नऊच्या सुमारास अचानक घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता, की घराचे पत्रे उडाले. मोठा आवाज झाल्याने शेजारी-पाजारी सिंग यांच्या घराच्या दिशेने धावले. जमा झालेल्या नागरिकांनी या आगीची माहिती संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाला दिली. परंतु, अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोचण्यापूर्वीच स्थानिकांनी आग विझवली होती. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना जास्त भाजले असून, जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गॅसगळती झाल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या वर्षभरात तीन घटना घडल्या असून चिखली, सांगवी, वाल्हेकरवाडी परिसरातील सिलिंडरचा स्फोट होऊन किरकोळ जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBlastस्फोटnewsबातम्या