शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना फसविणारे ‘पॉन्झी’ कार्यरत

By admin | Updated: December 21, 2015 00:34 IST

दामदुप्पट रक्कम मिळवून देण्याचे आमिष, कमी गुंतवणुकीवर मोठ्या रकमेचा लाभ अशा विविध योजना पुढे करून चिटफंडच्या नावाखाली कोट्यवधींची माया जमा करणारे

पिंपरी : दामदुप्पट रक्कम मिळवून देण्याचे आमिष, कमी गुंतवणुकीवर मोठ्या रकमेचा लाभ अशा विविध योजना पुढे करून चिटफंडच्या नावाखाली कोट्यवधींची माया जमा करणारे ‘पॉन्झी’ पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहेत. कमी गुंतवणुकीत जादा रक्कम मिळवून देण्याच्या चिटफंडच्या योजना सुरुवातीला सुरू करून जमा झालेली रक्कम नंतर अन्य व्यवसायांत वळवून चिटफंडशी संबंध नाही, हे भासविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. देशभरातील ‘चिटफंड’ गैरव्यवहाराची भांडाफोड होऊ लागल्यानंतर शहरातील ‘पॉन्झी’ हादरले आहेत. शहरात गेल्या दहा वर्षांत आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून सनराईज कन्सल्टन्सीवाला कोट्यवधी रुपये घेऊन येथून सहीसलामत निघून गेला. दामदुप्पट रक्कम मिळेल, या आशेवर ज्यांनी पैसे गुंतवले होते, त्यांना दुप्पट पैसे तर दूरची बाब; मुद्दलही मिळू शकली नाही. या फसवणुकीच्या प्रकारानंतर अद्यापपर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. मूळचा इटालियन असलेल्या चार्ल्स पॉन्झीने चिटफंडच्या माध्यमातून अमेरिकेतील बोस्टन शहरात १९२० मध्ये गुंतवणुकीवर जादा रक्कम देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांच्या रकमेचा अपहार केला. गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमा परत न करता ते पैसे अन्यत्र वापरले. या पॉन्झीच्या पावलावर पाऊल ठेवणारे चिटफंडवाले शहरात उदयास आले आहेत. भोसरी, संत तुकारामनगर, काळेवाडी, आकुर्डी, दापोडी, चिंचवड आणि शहरालगतच्या परिसरात त्यांनी जाळे पसरवले आहे. गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतविलेल्या रकमेचा परतावा न मिळाल्यास एखाद्याने पोलिसांकडे धाव घेतली, तर शहरातील अशा चिटफंडवाल्यांचे बिंग फुटणार आहे. गुंतवणुकीवर अवघ्या तीन महिन्यांत, सहा महिन्यांत जादा रक्कम मिळवून देतो अशा आकर्षक योजना जाहीर करून ग्राहकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडायचे, त्यांच्याकडून जमा होणारा पैसा जमीन खरेदी, गृहप्रकल्प उभारणी अशा कामासाठी वापरायचा असे उद्योग केले जात आहेत. काहींनी तर प्रतिदिनी शेकडा चार ते पाच टक्के याप्रमाणे खासगी सावकारांकडे रकमा गुंतविल्या. सावकारी करणारे चोरावर मोर निघाले. त्यांनी या चिटफंडवाल्यांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विविध योजना सुरू करणाऱ्यांनाच गंडा घातला असताना, याची वाच्यता नको म्हणून अशा प्रकरणांची फिर्याद देण्याचे धाडस चिटफंडचे संचालक दाखवत नाहीत. मात्र, ठिकठिकाणचे चिटफंड घोटाळे उघड होऊ लागल्याने शहरातील चिटफंडवाल्यांचे धाबे दणाणले आहे.(प्रतिनिधी)