शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएसआर’साठी कंपन्या उदासीन, परराज्यासाठी केली जाते मोठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:02 IST

आयटीनगरीतील गावांची व्यथा : परराज्यासाठी केली जाते मोठी मदत

हिंजवडी : हिंजवडी आयटीनगरी परिसरात माहिती-तंत्रज्ञान, तसेच खासगी कंपन्यांचे मोठे जाळे आहे. मात्र ठरावीक गावांचा अपवाद वगळता परिसरातील इतर गावे, वाड्या-वस्त्यांना सीएसआर निधीतून मदत करण्याबाबत या कंपन्या उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे.

आयटीनगरीमध्ये माहिती-तंत्रज्ञान, तसेच इतर २५० हून अधिक कंपन्या आहेत. कंपनी कायदा २०१३ कलम १३५ नुसार ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींपेक्षा जास्त आहे किंवा वार्षिक निव्वळ नफा ५ कोटी आहे, अशा कंपन्यांना नफ्याच्या किमान दोन टक्के निधी समाजासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. येथील कंपन्यांकडून केरळमधील महापूर, उत्तराखंडचा महाप्रलय, राज्यातील दुष्काळग्रस्त गावे, सामाजिक संस्था, आश्रमशाळा यांना मदतीचा ओघ सुरू असतो. मात्र, आयटीनगरीतील गावांना कंपनी सीएसआर निधीतून फारशी मदत होत नसल्याचे ग्रामपंचायतींकडून सांगितले जाते. आयटीनगरीतील माणमधील जिल्हा परिषद शाळेची भव्य इमारत, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक लॅब, २५ संगणक, ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके, स्वखचार्तून दर शनिवारी मार्गदर्शन शिबिरे, शौचालय, तसेच नेरे गावामध्ये शाळेची इमारत अशा प्रकारची मदत झालेली आहे. लगतची इतर गावे मात्र मागील काही वर्षांपासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येते. ज्या परिसरात कंपन्या विस्तारलेल्या आहेत, त्या परिसरातील गावांना सीएसआर निधी खर्च करताना प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे काही ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांचे मत आहे.हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीत ९० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. दीड वर्षापासून अनेक कंपन्यांना सीएसआर निधीतून मदत मिळण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र कोणाकडूनही कसलीच मदत मिळाली नाही की केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तरसुद्धा मिळालेले नाही. सगळीच विकासकामे ग्रामपंचायत करू शकत नाही. त्यामुळे जवळील कंपन्यांकडे मदत मागितली जाते. कंपन्यांनीसुद्धा सीएसआर निधी खर्च करताना स्थानिक गावांचा प्राधान्याने प्रथम विचार करणे गरजेचे आहे.- तुळशीदास रायकर, ग्रामविकास अधिकारी, हिंजवडी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड