शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीसाठी अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2015 01:12 IST

ढोल-ताशांचा टिपेला पोहचलेला गजर, आकर्षक फुलांची सजावट, चित्तथरारक मर्दानी खेळ, विविध वाद्यांच्या गजरात, भगवे फेटे परिधान केलेल्या लेझीम पथकासह मिरवणुकीने आपल्या लाडक्या

भोसरी : ढोल-ताशांचा टिपेला पोहचलेला गजर, आकर्षक फुलांची सजावट, चित्तथरारक मर्दानी खेळ, विविध वाद्यांच्या गजरात, भगवे फेटे परिधान केलेल्या लेझीम पथकासह मिरवणुकीने आपल्या लाडक्या गणरायांना मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला.गेल्या दहा दिवसांपासून सगळीकडे गणेशोत्सवाचा आंनद सोहळा सुरू होता. या सोहळ्याची सांगता मोठ्या भक्तिभावात उत्साहात झाली. दर वर्षी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी येथील सर्व मंडळांकडून गणरायाला निरोप दिला जातो. भोसरीतील गणपतीच्या विविध देखाव्यांबरोबर येथील मिरवणूकही प्रेक्षणीय ठरते. या वर्षी बहुतांशी मंडळांनी महिला व पुरुषांची ढोल- ताशांची विविध पथके आणली होती. पुणे व पिंपरी- चिंचवडच्या अनेक शाळांच्या या पथकांमुळे भोसरीत अतिशय उत्साही वातावरण निर्माण झाले होते. मुख्य मिरवणुकीस सायंकाळी साडेसहानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. मात्र, मुख्य विसर्जन मिरवणुकीत गुलाल व भंडाऱ्यांचा वापर टाळण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता. लांडगे लिंबाची तालीम मंडळ, पठारे लांडगे तालीम मंडळ, फुगे माने तालीम मंडळ यांनी हलता जहाजाचा देखावा सादर केला होता. श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या भोजापूर राजा, खंडोबा आळीचे खंडोबा मित्र मंडळ, (माळाचा राजा) गव्हाणे तालीम, मधले फुगे तालीम मंडळ व लांडेवाडी येथील नवमहाराष्ट्र मित्र मंडळाने आकर्षक फुलांच्या सजावटीवर भर दिला होता.मुख्य मिरवणूक शिस्तबद्धपणे सुरू होती. सायंकाळी साडेपाचनंतर भोसरी गावठाण व परिसरातील मंडळे मिरवणुकीसाठी बापुजीबुवा चौकात जमत होती. साडेसहानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. वाजत-गाजत सुरू असलेला हा मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी भोसरीकर नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मुख्य मिरवणुकीत ढोल-ताशांच्या खेळांच्या पथकांनी एकच रंगत आणली होती. महिला व मुलींच्या आकर्षक वेशभूषेसह भगवे फेटे परिधान केलेल्या मुला-मुलींची पथके खास आकर्षण ठरत होती. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. महापालिकेने बनविलेल्या हौदात, तर काही मंडळांनी अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी असलेल्या विहिरीत विसर्जन करून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. (वार्ताहर)