शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: September 27, 2015 01:13 IST

गणेशोत्सवाचा आनंद सर्वांनाच हवाहवासा वाटतो. या उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त होऊ लागले असून, खर्चालाही मर्यादा राहिलेली नाही

मंगेश पांडे,पिंपरीगणेशोत्सवाचा आनंद सर्वांनाच हवाहवासा वाटतो. या उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त होऊ लागले असून, खर्चालाही मर्यादा राहिलेली नाही. यामुळेच या उत्सवात केवळ पिंपरी-चिंचवड शहरात या वर्षी कोट्यवधींची उलाढाल झाली. मंडप, देखावा, मिरवणूक, विद्युत व्यवस्था यावर एका मंडळाचा दहा दिवसांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. शहरात अनेक मंडळे आहेत. यामध्ये मोठ्या मंडळांची संख्याही मोठी आहे. उत्सवात करण्यात येणाऱ्या खर्चासाठी सभासदांसह नागरिकांकडून वर्गणी घेतली जाते. जमा-खर्चाचा ताळेबंद न बसल्यास प्रसंगी सभासदच अधिकची वर्गणी काढून अधिकाधिक चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात. या उत्सवातील सर्वांत मोठा खर्च असतो मंडप उभारणीसाठीचा. सध्या वीस बाय वीस आकाराच्या मंडपाचा दहा दिवसांचा किमान तीस हजार रुपये खर्च आहे. मात्र, मोठ्या मंडळांचे मंडप या आकारापेक्षाही मोठे असतात. भव्य स्वागत कमान उभारणीसह विद्युत रोषणाई करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. अशा मंडळांच्या दहा दिवसांच्या मंडपाचा आणि विद्युत व्यवस्थेचा खर्च किमान दोन लाखांपर्यंत जातो. सध्याची मंडळे जिवंत देखावे सादर करण्यावर अधिक भर देत आहेत. या देखाव्यांसाठीचे कलाकार असले, तरी त्यासाठीचा पोशाख व व्हाइस रेकॉर्डिंग यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. तर, हलत्या देखाव्यांसाठी मूर्तींची आवश्यकता असते. याचे दर मूर्तींच्या उंचीवर अवलंबून असतात. देखाव्याचा पूर्ण संच किमान वीस हजारांपासून दीड ते दोन लाखांपर्यंत असतो. दहा दिवसांच्या देखाव्यावर मंडळाचा किमान तीन ते चार लाखांचा खर्च होतो. बहुतेक मंडळे विसर्जन मिरवणूक अधिकाधिक भव्य आणि आकर्षक होण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा वेळी खर्चाचाही विचार केला जात नाही. मूर्ती नेण्यात येणाऱ्या ट्रॉलीवरील सजावटीकडे अधिकाधिक लक्ष दिले जाते. फुलांचे, ओढण्यांचे सजावटीचे सेट तयार केले जातात. यासाठी ८० हजार ते १ लाखांपर्यंतचा खर्च येतो. यासह काही मंडळे मिरवणूक रथापुढे देखावादेखील करतात. यासाठीही मोठ्या प्रमाणात खर्च येतो. चित्तथरारक खेळ, फटाक्यांची आतषबाजीही असते. मिरवणुकीसाठी आवश्यक असलेले ट्रॅक्टर मिळणेही कठीण झाले आहे. भरमसाठ पैसे देऊनही ट्रॅक्टर उपलब्ध होत नाहीत. या ट्रॅक्टरसाठी तासावर भाडे आकारले जात आहे. दोन ते तीन हजार रुपये भाडे घेतले जात आहे. मिरवणुकीत ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी आहे. त्यामुळे बहुतेक मंडळे ढोल-ताशा पथक आणतात. या पथकातील सदस्यांची संख्या, ढोलची संख्या आणि किती वेळ वाजविणार आहे, यावर त्या पथकाचे मानधन अवलंबून असते. मात्र, मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनही पथकात अधिकाधिक ढोल असावेत, अशी मागणी असते. त्यामुळे मानधनही त्याच तुलनेत मोजावे लागते. किमान पन्नास हजारांपासून एक लाखांपर्यंत मानधन घेतले जाते.