शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीतील सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:41 IST

ज्यूस सेंटरजवळ आलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नितीन रोकडे या आरोपीसह साथीदारांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : ज्यूस सेंटरजवळ आलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी नितीन रोकडे या आरोपीसह साथीदारांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मी नगरसेवक होणार आहे, तू माझ्याबरोबर फिरायला चल’ असे म्हणत गैरवर्तन केले. तसेच पोलिसांकडे तक्रार देऊ नये, असे धमकावल्याची फिर्याद महिलेने रोकडे यांच्यासह साथीदारांविरुद्ध दिली आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोकडे हे मित्रांबरोबर चिखलीतील ज्यूस सेंटरवर थांबले होते. त्या वेळी तेथून जात असलेल्या महिलेजवळ जाऊन आरोपीने तिला फिरायला येण्याची आॅफर दिली. मात्र महिलेने नकार दिला. त्या वेळी आरोपीने महिलेशी असभ्य वर्तन केले. घडल्याप्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुला व तुझ्या मुलीला बघून घेतो, असे धमकावत महिलेच्या कपाळावर ग्लास मारला.>मोशीत तिघांवर तक्रार दाखलपिंपरी : कपड्यांना इस्त्री केल्याचे पैसे देण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपींनी मोशी, नागेश्वरनगर येथे राहणाऱ्या मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत ज्ञानेश्वर जगदाळे (रा. नागेश्वरनगर, मोशी) या प्रमुख आरोपीसह अन्य दोन आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ३१ वर्षे वयाच्या महिलेने आरोपींविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिलेची मुलगी एकटीच घरी असताना, आरोपी दोन साथीदारांसह तिच्या घरी गेला. घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा उठवीत त्याने मुलीचा विनयभंग केला.