Crime News : देहूरोड हायवेवर थरार..! कार आडवी का घातली ? विचारताच दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:10 IST2026-05-05T18:09:49+5:302026-05-05T18:10:04+5:30

Crime News : एका कारचालकाने अचानक डिव्हायडर ओलांडत कार महामार्गावर आणली.

Crime News Thrill on Dehu Road Highway..! Why did the car stop? A fatal attack on a biker after asking | Crime News : देहूरोड हायवेवर थरार..! कार आडवी का घातली ? विचारताच दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला  

Crime News : देहूरोड हायवेवर थरार..! कार आडवी का घातली ? विचारताच दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला  

पिंपरी - देहूरोड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूप मारहाणीत बदलल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर अचानक कार आडवी घालून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन जणांनी एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दुचाकीस्वाराच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे घडली. याप्रकरणी रोहिदास शांताराम जाधव (वय ४८, रा. शेलारवाडी, ता. मावळ) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे आपल्या दुचाकीवरून देहूरोडहून शेलारवाडीकडे जात होते. त्यावेळी एका कारचालकाने अचानक डिव्हायडर ओलांडत कार महामार्गावर आणली. त्यामुळे जाधव यांनी संबंधित चालकाला कार आडवी का घातली, असा जाब विचारला. याच कारणावरून आरोपी संतप्त झाले.

वाद वाढल्यानंतर आरोपींनी जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट केले आहे.  या प्रकरणी नरेंद्र अशोक मुरुडकर आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : देहूरोड हाईवे पर दहशत: लापरवाह ड्राइविंग पर सवाल उठाने पर बाइकर पर हमला

Web Summary : देहूरोड में हाईवे पर एक ड्राइवर द्वारा रास्ता रोकने पर सवाल उठाने पर एक बाइकर पर बेरहमी से हमला किया गया। हमले में बाइकर की नाक में फ्रैक्चर हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।

Web Title : Dehuroad Highway Horror: Biker Attacked for Questioning Reckless Driving

Web Summary : A biker was brutally attacked in Dehuroad for questioning a driver who blocked the highway. The assault resulted in a fractured nose. Police have registered a case and are investigating.