शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर
2
Monsoon Update : तुझं आगमन...अनमोल म्हणावं! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार
3
जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला आमदार रोहित पवार! म्हणाले, "पोर्शे कार अपघातावरुन लक्ष हटवण्यासाठी ..."
4
पीएला अटक केल्यानंतर शशी थरूर यांना बसला धक्का; सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया 
5
लेट पण थेट! 'गुलाबी साडी' गाण्यावर 'बबिताजी' नेही केला डान्स, Video व्हायरल
6
Fact Check : राहुल गांधींनी भाजपाचं समर्थन करतानाचा 'तो' Video एडिटेड; 'हे' आहे 'सत्य'
7
उन्हाच्या झळा, भक्तांची गर्दी थांबेना; एक लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, नियमही बदलले! 
8
"गेल्या १० वर्षांत...", कान्स फेस्टिव्हल गाजवलेल्या छाया कदम यांच्यासाठी मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट
9
कौतुकास्पद! दिवसा अभ्यास अन् रात्री हॉटेलमध्ये काम; गौरवने दहावीत मिळवले ९७ टक्के
10
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...
11
One97 Communication Share : ६ महिन्यांमध्ये अर्धा झाला Paytmच्या शेअर्सचा भाव, आता सलग दोन दिवसांपासून अपर सर्किट
12
वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...
13
PM मोदी आजपासून विवेकानंद रॉकवर, ४५ तासांचं ध्यान; समुद्र किनाऱ्यावर लोकांची एन्ट्री बॅन, असा असेल कार्यक्रम
14
अभिनेता देवानंदमुळे पंतप्रधान मोदींनी घेतला समाजसेवेचा वसा; 'या' सिनेमामुळे मिळाली नवी दिशा
15
“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक
16
Mazagon Dock Share Price : ₹१४५ वर आलेला शिपिंग कंपनीचा IPO, ४ वर्षांपेक्षा कमी काळात शेअर पोहोचला ₹३४९९ पार
17
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
18
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
19
Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स असेल तर क्लेम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार नाही, ३ तासांत होणार काम
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली

Corona virus : कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपणारं जोडपं... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 6:39 PM

स्वत:च्या जगण्याची भ्रांत असताना इतरांचा विचार... 

वाकड : कोरोनाचे संकट ओढावल्यावर देश लॉकडाऊनमध्ये असताना घरी निवांत आराम करण्याऐवजी समाज मनाशी नाळ जोडली गेलेल्या या दांपत्याला स्वस्थ बसवेना, जागोजागी अडकून पडलेल्यांचे हाल बघवेना त्यामुळे करोना संकटाला सामोरे जात सामाजिक योगदान देण्याचा निश्चय त्यांनी केला. स्वत:ची झोळी फाटकी असताना त्यांनी अनेकांची पोटं भरत त्यांच्या मनात व हृदयात जागा मिळविली आहे.  मोहन नगर, चिंचवड येथील ज्ञान दानात रमणारे व देशाची भावी पिढी घडविणारे शिक्षक दांपत्य महिन्याभरापासून समाजसेवेचे अविरत दान देत आहेत. या कोरोना लढ्यात असंख्य गरीब, गरजू व निराधार नागरिकांचा ते एकमेव पर्याय व भरभक्कम आधार बनले आहेत. दीपक जाधव व वैशाली जाधव असे या शिक्षक पती-पत्नीचे नाव...

सुरुवातीला घरातूनच भाजी-पोळी, वरण-भात तयार करून अनेकांना जेवणाचे डबे पुरवित प्रेमाचा घास भरविला. दुर्बल, गरजू, निराधार  व दिव्यांग बांधवांना स्वस्त धान्य दुकानातील रेशन मिळण्यासाठी कंबर कसली. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने त्यांनी असंख्य गरजूंना ते धान्य घर पोहोच केले. ज्या लोकांना रेशनिंग मिळत नाही असे भाडेकरू, परप्रांतीय मजूर, गवंडी, वाहन चालक, धुणे-भांडी करणाऱ्या महिला अशा सर्वांना देव दर्शन युवा मंच व जैन विहार ग्रुपच्या मदतीने दोन वेळचे जेवण देण्याची नित्य जबाबदारी हे दांपत्य पार पाडत आहेत.
नि:स्वार्थीपणे समाजसेवा करणारे हे शिक्षक समाजसेवेबरोबरच वेळोवेळी कोरोना विषयी जनजागृती करून घ्यावयाच्या काळजीचे धडे नागरिकांना देत आहेत. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या खिचडी व जेवण वाटपाच्या ठिकाणी जाऊन स्वयंसेवक देखील बनत सामाजिक अंतराचे महत्व पटवून देत दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवून तोंडाला मास्क बांधण्याचा सूचना देताना दिसतात. याकामी त्यांचे मनोबल वाढविणारे, प्रोसाहन देणारे मोहन नगर पोलीस चौकीतील पोलिस हवालदार धर्मा झांजरे व घर सांभाळुन आई-वडीलांसोबत राबणा?्या दोनही मुलांचे त्यांनी आवर्जून आभार मानले......................स्वत:च्या जगण्याची भ्रांत असताना इतरांचा विचार ज्ञानदानाच्या पवित्र कामाचे स्वप्न उरी बाळगणारे हे उच्चशिक्षित (पती- सायन्स डी.एड, पत्नी- एमए.बी.एड) पती-पत्नी कुठल्याही शासकीय अथवा खाजगी शाळेत कायम स्वरूपी शिक्षण सेवेत शिक्षक म्हणून रुजू नाहीत. दोघे मिळून एक खाजगी शिकवणी चालवून आपली गुजराण करतात. तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नावर संसार जेमतेम सुरू असताना, स्वत:च्या जगण्याची भ्रांत असताना समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची ही वृत्ती आदर्श मानावी अशीच आहे.

टॅग्स :wakadवाकडcorona virusकोरोना वायरस बातम्या