पिंपरी : पाणीपुरवठा क्षेत्रातील प्रगत आणि उत्तम तंत्रज्ञानाची माहिती अवगत करण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता आर. व्ही. दुधेकर हे दक्षिण कोरिया वारी करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला स्थायी समिती सभेत मंजुरी दिली.कोरिया वॉटर अँड वेस्ट वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे २० व २१ आॅक्टोबरला सेऊल, दक्षिण कोरिया येथे दोन दिवसांच्या या फेअरमध्ये पाणीपुरवठा क्षेत्रातील प्रगत, तसेच चांगल्या कंपनीचे उत्पादन व तंत्रज्ञानाची माहिती अवगत होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. या दौऱ्याचा सर्व खर्च आयोजक करणार आहेत. दुधेकर यांना पाठविण्याचा प्रस्ताव आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिला होता. त्यास मंजुरी देण्यात आली.(प्रतिनिधी)
सह शहर अभियंत्यांची कोरीया वारी
By admin | Updated: October 6, 2016 02:37 IST