शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन उमेदवारांत प्रचारावेळी वादावादी

By admin | Updated: February 20, 2017 02:52 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काळुराम पवार आणि भाजपाचे शैलेश मोरे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काळुराम पवार आणि भाजपाचे शैलेश मोरे यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर दोघांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात एकजण जखमी झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. दोन्ही उमेदवारांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोन गटांत चिंचवड येथे वाद झाले. त्यानंतर उमेदवारांचे समर्थक एकमेकांशी भिडले. त्यामध्ये जखमी झालेल्या कार्यकर्त्याला वायसीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर काळुराम पवार याच्यासह बाळू पवार, किरण तेलंगे व अन्य एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार असल्याने गुन्हा दाखल करण्यास शनिवारी रात्री उशीर झाला. त्यानंतर या संवेदनशील प्रभागांत पोलिसांनी रविवारी बंदोबस्त वाढविला होता. (प्रतिनिधी)उमेदवार पुत्रावर  पैसे वाटपाचा गुन्हा पिंपरी : चिंचवड येथे मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवार गुरुबक्ष पेहलानी यांच्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ३४ हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली.  प्रभाग क़्रमांक १९ मधील मतदारांच्या नावांची यादी, तसेच हस्ताक्षरात लिहिलेले सहा कागद यासह दोन हजारांच्या ६७ नोटा आरोपींकडे आढळून आल्या. जितू गुरुबक्ष पेहलानी, तसेच सुनील शांताराम धोत्रे (वय २५, रा. खराळवाडी) हे दोघे प्रभागातील मतदारांना पैसे वाटप करताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता १७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.