पिंपरी (पुणे) : म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या अभिनेता ‘सलमान खान रजनी’मध्ये वाजविण्यात आलेल्या गाण्यांची परवानगी मिळावी, म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून देण्यात आलेला धनादेश वटला नसल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मंगळवारी हिंजवडी पोलिसांकडून कार्यक्रमाची आयोजक फोरपिलर्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नोवेक्स कंपनीचे मोहम्मद सय्यद (२९, रा. अंधेरी) यांनी फिर्याद दिली आहे. कंपनीचे संचालक समीर दिनेश पवानी आणि व्यवस्थापक मनीष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘सलमान खान रजनी’च्या इव्हेंट कंपनीविरूद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:47 IST