पिंपरी : ताथवडे परिसरात एका गोदामात बसून एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस येताच पैसे वाटप करणारे कार्यकर्ते पसार झाले. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. महापालिका प्रचाराची धामधूम सुरू असताना, मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मोरवाडीत एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिक्सर वाटप केल्याची चर्चा होती. त्यानंतर ताथवडेत पैसे वाटप करत असल्याचा प्रकार मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. मतदार ओळखपत्र घेऊन येणाऱ्या महिलांना पैसे वाटप केल्याची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तक्रार होती. मात्र, रात्री उशीरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही. (प्रतिनिधी)
पैसे वाटपाची ताथवडेत तक्रार
By admin | Updated: February 15, 2017 02:18 IST