शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

खोट्या अकाउंटबाबत कंपनीही जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:53 IST

राजकारण किंवा चित्रपटसृष्टीमधील नामवंतांना किंवा नेटसॅव्ही युवतींना बनावट फेसबुक, टिष्ट्वटर अकाऊंट किंवा तत्सम खात्यांमुळे वाढती डोकेदुखी झाली असून अशा बनावट

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राजकारण किंवा चित्रपटसृष्टीमधील नामवंतांना किंवा नेटसॅव्ही युवतींना बनावट फेसबुक, टिष्ट्वटर अकाऊंट किंवा तत्सम खात्यांमुळे वाढती डोकेदुखी झाली असून अशा बनावट अकाऊंटबद्दल तक्रार केल्यानंतर सेवा पुरवठादार मध्यस्थांनी (इंटरमिडीअरी) असे खाते ३६ तासांमध्ये बंद करणे आवश्यक आहे, असे सायबर कायद्यातील तज्ज्ञांचे मत आहे. पोलीसही असे खाते किंवा प्रोफाईल बंद करण्याबाबत काढून टाकण्याबाबत कारवाई करू शकतात.फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर भाजपानेते गिरीश बापट यांचे बनावट खाते उघडून त्यावर आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्या प्रकरणी ॠतुराज नलावडे (जुन्नर) या तरुणास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. माध्यम सल्लागार सुनील माने यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्यामुळे  सोशल नेटवर्किंग साईटवर  उघडले जाणारे बनावट खाते हा  विषय ऐरणीवर आला आहे.नलावडे याने १५ जणांचे बनावट खाते उघडल्याचे तसेच काल्पनिक महिलांच्या नावे खाते उघडल्याचे सायबर क्राईम शाखेच्या पोलिसांना समजले आहे.मध्यंतरी सायबर क्राईम शाखेने राजस्थानमधील २७ वर्षीय युवकाला बनावट खाते उघडल्याबद्दल अटक केली. पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या नावे त्याने खाते उघडून ती वेश्याव्यवसाय करीत असल्याचे भासविले होते. एमबीएमध्ये शिकणाऱ्या युवतीचे बनावट खाते उघडून त्यावर तिचा संपर्क क्रमांक देणाऱ्या सायबर ठगावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माहिती प्रसारित करणे, साठवून ठेवणे आणि माहिती घेणे किंवा तत्सम सेवा देणे याबाबत माहिती प्रसारण क्षेत्रातील सेवा पुरवठादार व्यक्ती किंवा संस्था काम करीत असेल तर तिला मध्यस्थ (इंटरमिडीअरी) अशी संज्ञा आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही मध्यस्थाने घातक, आक्षेपार्ह, अज्ञानवयीनांवर परिणाम करू शकेल असे किंवा बेकायदेशीर मजकूर किंवा चित्र, छायाचित्र प्रसारित होऊ नये, यासाठी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सायबरतज्ज्ञांचे मत आहे.अश्लील छायाचित्रे गुन्हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ कलमानुसार अश्लील छायाचित्रे प्रदर्शित करणे हा गुन्हा असून ज्यांच्या नावे अशा प्रकारे बनावट खाते उघडले गेले आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे बनावट खाते किंवा त्यावरील मजकूर बंद करण्याबाबत, काढून टाकण्याबाबत पोलीस पावले उचलू शकतात, असे सायबरतज्ज्ञांचे मत आहे. कोणत्याही व्यक्तीच्या खासगीपणामध्ये प्रवेश करणे, त्याच्या नावे बनावट खाते उघडणे, त्याला असलेल्या व्यक्तिमत्त्वाबाबत फसवणूक करणे आणि ओळख चोरी करणे असे प्रकार सायबर कायद्यानुसार स्पष्टपणे गुन्हा ठरतो.