शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आयुक्तांनी काढली महापौरांची समजूत

By admin | Updated: February 10, 2016 03:25 IST

महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेत दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या नावावरून नाराज झालेल्या महापौर शकुंतला धराडे यांची समजूत काढण्याची वेळ आयुक्त राजीव जाधव

पिंपरी : महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेत दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या नावावरून नाराज झालेल्या महापौर शकुंतला धराडे यांची समजूत काढण्याची वेळ आयुक्त राजीव जाधव यांच्यावर आली. आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर अखेरीस एकाच पुरस्कारासाठी राजश्री धनंजय पोटे आणि सुप्रिया सुनील सोळंकुरे यांच्या नावाची घोषणा महापौरांनी केली. यंदाच्या पुरस्कारासाठी पाच जणांचे अर्ज आले होते. त्यात महापौरांनी पोटे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार महापौरांनी दिलेल्या एका नावाची शिफारस आणि समितीने दिलेले दुसरे नाव असे दोन पुरस्कार जाहीर करावेत, अशी सूचना प्रशासनाने महापौरांना केली. मात्र, पवनाथडी जत्रेच्या मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतच सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या नावावरून महापौर आणि सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्या शाब्दिक वादावादी झाली. या पुरस्कारासाठी नाव सुचविले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न महापौरांनी केला. त्या वेळी खांडकेकर यांनी पुरस्कारासाठी दोन नावे असल्याचे सांगितले. त्यावर ‘मी एकच नाव दिले होते. पुरस्कार एकाच व्यक्तीला द्या. दोन नावे कशासाठी? एक महिला सात वर्षे पुरस्कारासाठी अर्ज करीत आहे. तिच्यावर अन्याय कशासाठी, असा प्रश्न महापौरांनी केला. आपल्याही नावाचा विचार या पुरस्कारासाठी केला आहे, अशी भूमिका खांडकेकर यांनी मांडली. त्यानंतर आयुक्तांनी महापौरांची समजूत काढली. पुरस्काराची दोन्हीही नावे राष्ट्रवादीच्या संदर्भातील आहेत. पोटे यांचे नाव महापौरांनी, तर सोळंकुरे यांचे समितीने सुचविले आहे. सोळंकुरे या राष्ट्रवादीच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. (प्रतिनिधी)