शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मतदारांमुळे लढतीत रंग

By admin | Updated: February 12, 2017 05:14 IST

संत तुकारामनगर प्रभागात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे योगेश बहल आणि भाजपाचे यशवंत भोसले यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक २० मध्ये नव्याने काही

पिंपरी : संत तुकारामनगर प्रभागात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे योगेश बहल आणि भाजपाचे यशवंत भोसले यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक २० मध्ये नव्याने काही परिसर समाविष्ट झाला आहे. बहल यांनी संत तुकारामनगर भागातून यापूर्वी निवडणूक लढविली आहे. मात्र, नव्याने जोडलेल्या भागातील मतदारांपर्यंत पोहाचणे त्यांनाही कठीण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले कामगार नेते यशवंत भोसले यांच्याशी त्यांची २० ड मध्ये लढत होत आहे. यशवंत भोसले हे कामगार नेते असल्याने या अटीतटीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रभाग क्रमांक नऊची मतदारसंख्या ४९ हजार ३०९ इतकी आहे. विशाल थिएटर, वैशालीनगर, कासारवाडीचा अग्रसेननगर, कुंदननगर, पार्श्वनाथ सोसायटी हा परिसर संत तुकारामनगर प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. लोकसंपर्क आणि नगरसेवक पदाचा अनुभव गाठीशी असला, तरी बहल यांना पूर्वीप्रमाणे सहज अशी निवडणूक राहिलेली नाही. या गटात शिवसेनेचे विजय कापसे, मनसेचे संजय यादव हेसुद्धा रिंगणात आहेत. त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. प्रभाग पद्धत असल्याने पॅनेलमधील उमेदवारांना बरोबर घेऊन जाणे भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहल यांच्या पॅनलमध्ये ब गटातून श्याम लांडे, अ गटातून सुलक्षणा धर-शिलवंत, संगीता सुवर्णा हे उमेदवार आहेत.(प्रतिनिधी)प्रभाग २० ‘अ’ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलक्षणा धर-शिलवंत,भाजपाच्या प्रियंका ननावरे,शिवसेनेच्या अनुराधा माने, काँग्रेसच्या मनाली मोरे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. ‘ब’ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम लांडे, शिवसेनेचे राजेश वाबळे यांच्यात लढत होणार आहे, तर त्यांना काँग्रेसचे अमरसिंग नाणेकर, भाजपाचे कुणाल लांडगे टक्कर देत आहेत. ‘क’ गटात राष्ट्रवादीच्या संगीता सुवर्णा,भाजपाच्या सुजाता पलांडे आणि शिवसेनेच्या सुरेखा लांडगे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.