शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

उमेदवारीसाठी कोलांटउड्या

By admin | Updated: November 18, 2016 04:49 IST

नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष जोर लावू लागले आहेत. प्रतिस्पर्धी पक्ष्यांचे तगडे उमेदवार गळाला लावण्याचे

लोणावळा : नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष जोर लावू लागले आहेत. प्रतिस्पर्धी पक्ष्यांचे तगडे उमेदवार गळाला लावण्याचे व उमेदवारांच्या पळवापळवीचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यासाठी पदाची आणि उमेदवारीची आमिषे दाखविली जात आहेत. काही तगडे इच्छुक उमेदवारीसाठी पक्ष बदल करू लागले आहेत. निवडणुकीत यश मिळविण्यासाठी उमेदवारांच्या या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या सुरू झाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोणावळा नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका शकुंतला विलास इंगुळकर यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तळेगाव येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय तथा बाळा भेगडे व ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा प्रवेश झाला. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक रमेशभाऊ इंगुळकर, विलास इंगुळकर, प्रकाश इंगुळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, लोणावळा शहराध्यक्ष बाबा शेट्टी, अविनाश बवरे, बाळासाहेब जाधव, सोमनाथ जांभळे, राजेंद्र चौहान, नगरसेविका रूपाली जाधव, युवा मोर्चा कार्याध्यक्ष अरुण लाड, माजी कार्याध्यक्ष हर्षल होगले, महेश मसणे, सागर बोरकर आदी उपस्थित होते.वलवण गावातील इंगुळकर परिवार हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. शकुंतला इंगुळकर ह्या मागील पंचवार्षीक काळात राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून गेल्या होत्या. त्यापूर्वी त्यांचे दीर रमेश इंगुळकर व सासरे खंडुजी इंगुळकर यांनीदेखील नगर परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. राजकारणाची मोठी परंपरा असलेल्या इंगुळकर परिवाराने भाजपामध्ये प्रवेश केल्याने वलवण गावात राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे. मागील वर्षी याच गावातील पाळेकर या तालेवार परिवारातील रमेश पाळेकर व इतर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. एकेकाळीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस व राष्ट्रवादी अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.शकुंतला इंगुळकर यांना प्रवेशासोबतच भाजपाची वलवण गावातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असून, लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात येत आहे. भाजपाने दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित झालेल्या न्यू तुंगार्ली प्रभाग क्र. १ मधील उमेदवार मोहिनी दत्तात्रय बनकर यांना उमेदवारी जाहीर करत पहिला धक्का दिला होता, तर इंगुळकर यांच्या प्रवेशाने दुसरा धक्का राष्ट्रवादीला बसला आहे. (वार्ताहर)