शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

थंडी मानवली कडधान्यांना

By admin | Updated: March 3, 2017 01:35 IST

कडधान्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश ढोरे यांनी सांगितले.

शिवणे : पवन मावळात दर वर्षीच्या तुलनेने या वर्षी जास्त पडलेल्या थंडीचा हरभरा, वाटाणा, मसूर, श्रावणी घेवडा, पावडा यांसारख्या कडधान्यांना चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश ढोरे यांनी सांगितले.पवन मावळातील जवळजवळ ९० टक्के शेतकरी हा आपल्या शेतात बाराही महिने वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेत असतो. थंडीच्या कालावधीत येथील शेतकरी गहू, हरभरा, वाटाणा, मसूर, श्रावणी घेवडा, पावडा यांसारखे पिके घेत असतो. काही शेतकऱ्यांची हरभरा, वाटाणा आदी कडधान्य काढणीला आल्याने त्यांची मोठी लगबग चालू असल्याचे दिसत आहे. वाटाणा, हरभरा, मसूर पिके काढून त्यांना घराशेजारील अंगणात किंवा घरावरील पत्र्यावर वाळविण्यासाठी काही दिवस ठेवला जातो. आतील दाणे पूर्ण वाळल्याची खात्री केल्यानंतरच त्याची मळणी केली जात असल्याचे ढोरे यांनी सांगितले. ढोरे स्वत:, त्यांच्या पत्नी मालनबाई आणि कुटुंबातील इतरांची सध्या मळणीनंतर उफणणीची लगबग सुरू आहे.कडधान्यांना या थंडीचा चांगलाच फायदा झाला असल्याचे मळवंडी ढोरे येथील प्रगतिशील शेतकरी भाऊ विश्वनाथ ढोरे यांनी सांगितले. कडधान्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होत असल्याचे शेतकरी कुटुंबातील हिराबाई लोखंडे यांनी सांगितले.मावळ तालुक्यात भाताचे भरघोस उत्पादन घेतले जात असले तरी ज्वारी, बाजरी, गहू या सारखी पीकेही शेतकरी घेतात. विशेषत: घरच्या वापरासाठी ही पीके घेणारे अनेक शेतकरी आहेत. वर्षभर लागणाऱ्या डाळींसाठी कडधान्ये पीकविण्यातही अनेक प्रयत्न करतात. खरीप हंगामात आंतरपीक म्हणून थोड्या प्रमाणात कडधान्य घेतली जातात. अलीकडे डाळी किंवा कडधान्याचे दर वाढल्याने नगदी पीक म्हणूनही या पीकाकडे पाहिले जात आहे. (वार्ताहर)