पिंपरी : उत्पादनशुल्क विभागाने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे ५ लाख ९७ हजार ९९२ रुपयाचा दारू साठा जप्त केला. आतापर्यंत ४८ जणांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. उत्पादनशुल्क विभागाकडून कारवाईची मोहीम आहे. राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने विविध ठिकाणचे दारूसाठे जप्त केले. २१ लिटर देशी दारू, ३१ लिटर विदेशी दारू, ४० लिटर ताडी असा मद्यसाठा जप्त केला. (प्रतिनिधी)
आचारसंहिता भंगाचा ४८ जणांवर गुन्हा
By admin | Updated: February 20, 2017 02:49 IST