शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या वर्चस्वाला कोलदांडा

By admin | Updated: May 10, 2017 04:13 IST

भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार? निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी देणार की

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार? निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी देणार की पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार, की नेत्यांच्या बगलबच्च्यांना संधी देणार या विषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सुमारे पाच तासांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पक्षनेत्यांनी नावे दिली आहेत. वर्चस्ववादात अडकलेल्या भाजपातील स्थानिक नेत्यांच्या बगलबच्च्यांना स्थान न देता, पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने सदस्यपदी संघटन सरचिटणीस माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे यांना, तर राष्ट्रवादीने भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांना संधी दिली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आली आहे. उमेदवारी देण्यापासून तर विविध पदे देण्यात स्थानिक नेत्यांमध्ये वर्चस्ववादाचे राजकारण दिसून आले. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यात धुसफूस सुरू असल्याचे दिसते.निवडणुकीनंतर आमदार लांडगे गटाचे नितीन काळजे यांना महापौरपद, तर जगताप समर्थक सीमा सावळे यांना स्थायी समिती अध्यक्षपद आणि निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ पवार यांना सत्तारूढ पक्षनेतेपद दिले होते. नव्या-जुन्यांची मोट बांधण्याचे काम नेत्यांनी केले होते. काही प्रमाणात स्थानिक नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण दिसून आले. त्यानंतर स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. स्वीकृतपदी नेत्यांच्या बगलबच्च्यांना संधी देऊ नये, यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. स्वीकृत सदस्यपदासाठी माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश पदाधिकारी महेश कुलकर्णी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, माजी नगरसेवक शंकर जगताप, अमर मूलचंदानी, सारंग कामतेकर, शांताराम भालेकर, विजय फुगे, सचिन लांडगे, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस बाबू नायर, सूरज बाबर, निहाल पानसरे यांची नावे चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, विजय गावडे, संजय वाबळे, उल्हास शेट्टी, जालिंदर शिंदे, तानाजी खाडे, नीलेश पांढरकर, सेवा दलाचे आनंदा यादव यांच्या नावाची चर्चा होती.