शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘टॉयलेट लोकेटर’द्वारे स्वच्छतागृहांची माहिती

By admin | Updated: July 17, 2017 04:09 IST

पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने नागरिकांना स्मार्ट सुविधा

विश्वास मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने नागरिकांना स्मार्ट सुविधा पुरविण्याचे काम महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. टॉयलेट लोकेटर हे अ‍ॅप विकसित करण्यात येणार असून राज्यातील पहिला प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला आहे. तसेच अमृत योजना आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गतही विविध योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हगणदारी मुक्त शहरे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आता स्मार्ट सिटी योजनेत प्रामुख्याने नागरिकांना स्मार्ट सुविधा देण्यास प्राधान्य असणार आहे. याचाच एक भाग म्हणजे शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृह दर्शवणारे टॉयलेट लोकेटर अ‍ॅप विकसित केले जाणार आहे.शहरातील विविध रस्त्यावरील पेट्रोल पंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्थानके, बस स्थानके आदी ठिकाणी असणारे सार्वजनिक स्वच्छतागृहे, सामुदायिक स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने क्वॉलिटी कॉन्सिल आॅफ इंडियाच्या मदतीने हे अ‍ॅप विकसित केले जाणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपवर टाकण्यात येणार आहे. त्याअगोदर महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संबंधित अ‍ॅपवर आपण परिसराचे नाव टाकल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृह कोठे आहे, त्याचा पत्ता छायाचित्रासह उपलब्ध होणार आहे. अ‍ॅपचा उपक्रम देशातील दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, इंदूर, भोपाळ या शहरांमध्ये राबवविला आहे. अशा प्रकारचे अ‍ॅप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका असणार आहे.