शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षण अभियान : लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 02:43 IST

भारत देशातील सर्व राज्ये व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे

लोणावळा : भारत देशातील सर्व राज्ये व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे. नुकताच या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला. देशात पहिल्या १० शहरांमध्ये लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एकमेव शहर आहे.सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरुवात झाली. हे अभियान सुरू होण्याच्या किमान वर्षभर अगोदरपासूनच लोणावळा शहरात स्वच्छ मोहिमांना सुरुवात झाली होती. यातच हे सर्वेक्षण सुरू झाल्याने लोणावळा नगर परिषदेच्या सोबत येथील लोणावळा शहर पत्रकार संघ, लोणावळा शहर चित्रकार ग्रुप, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व नागरिक यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत लोणावळा शहरातील प्रत्येक भाग हा स्वच्छ करण्याकरिता प्रयत्न केले. या अभियानाला नागरिकांची साथ मिळाल्याने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ही लोणावळेकरांची मोहीम बनली होती. यातच शहरातील चित्रकार मंडळींनी विनामोबदला शहरातील सर्व भिंतींवर आकर्षक चित्र रेखाटत शहराचे रूपडे बदलले, तर पत्रकार संघाने नगर परिषदेच्या सोबत स्वच्छ सर्वेक्षण या विषयावर चित्रकला स्पर्धा घेतली. या उपक्रमाला राज्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी भेट देत मुलांशी संवाद साधला होता. या दोन्ही उपक्रमांना देशात अनुक्रमे पाचवा व दुसरा क्रमांक मिळाला होता.केवळ शहरातील रस्ते किंवा कचराकुंड्या साफ न करता प्रत्येक विभागात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, आरोग्य विभागाच्या माजी सभापती पूजा गायकवाड, विद्यमान सभापती बिंद्रा गणात्रा आदींनी केले. नगर परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या सर्वेक्षणाकरिता झोकून देऊन काम केले. नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शक्य नसल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली आहे. सामूहिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे सांगत या मोहिमेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या सर्वांनी त्यांनी या यशाचे मानकरी ठरविले आहे.