शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात साथीच्या आजारांचे थैमान, नागरिकांची दवाखान्यांत रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:08 IST

शहरात डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत.

पिंपरी : शहरात डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदी आजारांनी थैमान घातले असून, हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खासगी रुग्णालये सध्या फुल्ल झाली आहेत. तर महापालिकेच्या रुग्णालयात गोरगरिबांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत जनजागृती करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण असूनही जिल्हा प्रशासन अंधारात कसे? स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग झोपा काढत आहेत का? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.शहरात रोगाच्या साथींनी नागरिकांना पछाडले आहे. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, रहाटणी, काळेवाडी आदी भागातील खासगी दवाखान्यात चिकुनगुनिया, डेंगी, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या रोगाची शिकारबनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. साथीच्या आजारानेजनता हैराण झाली असून, याबाबत प्रशासन मात्र सुस्त असल्याचेदिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून या साथींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतेही उपाय राबवले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी लाखो संख्येच्या शहरासाठी अत्यंत कमी कर्मचारी वर्ग आहे. सगळेच प्रशासकीय विभाग आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत. संबंधित गोरगरिबांच्या लोकांच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत.बहुतांश प्रभागांत आजाराने थैमान घातले असून, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर परिसरातील बहुतांश घरातील सदस्य आजारी असल्याचे दिसून येत आहे. आजारी पडलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात नेऊन रक्त तपासल्यानंतर डेंगी, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉईड आदीं आजाराचे निदान होत आहे. तसेच खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात डेंगी व चिकनगुनियाच्या आजाराने रुग्ण दाखल झाले आहेत. रक्ताची तपासणी करण्याचे दर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.महापालिकेच्या रुग्णालयात सध्या दररोज ४०० ते ५०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात विविध आजारांच्या तक्रारी घेऊन येत आहेत. साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असून, परिसरातील प्रभागात स्वच्छता करणे तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न, नागरिकांत जनजागृती याकडे लक्ष देण्याची गरज आहे.