शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

शहराचा निकाल ९०%

By admin | Updated: May 26, 2016 03:39 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला. यंदाही शहरात मुलींनीच ९४.१३ टक्के गुण मिळवून बाजी माारली.

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला. यंदाही शहरात मुलींनीच ९४.१३ टक्के गुण मिळवून बाजी माारली. तर मुलांनी ८६.५६ टक्के गुण मिळविले आहेत. शहराचा एकूण निकाल ९०.०१ टक्के लागला आहे.पुनर्परीक्षार्थी व नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मिळून एकत्रितपणे ९०.१ टक्के निकाल लागला आहे. तर मावळ भागाचा निकाल ८६.५१ टक्के लागला आहे. १८ फेब्रुवारी ते २८ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. बारावीच्या निकालाची सत्यप्रत विद्यार्थ्यांच्या हाती ३ जूनला मिळणार आहे. शहरातील १०० टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांमध्ये चिंचवडमधील के. जी. गुप्ता विद्यालय, सेंट उर्सुला, कमलनयन बजाज, दिघीतील रामचंद्र गायकवाड विद्यालय, व्हिरोजन विद्यालय, काळेवाडीतील निर्मल बोधानी कॉलेज, यमुनानगरमधील शिवभूमी विद्यालय, अमृता विद्यालय, आकुर्डीतील क्रिएटिव्ह विद्यालय, रहाटणीतील एसएनबीपी कॉलेजचा समावेश आहे. सकाळपासूनच विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता होती. अपेक्षेपेक्षा काहींना कमी टक्के मिळाल्यानेही पालक व विद्यार्थी नाराज झाले होते. नेटकॅफेवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. काहींनी मोबाइलवर निकाल पाहिला, तर काही पालकांनी घरात बसूनच संगणकावर आॅनलाइन निकाल पाहिला. गतवर्षीपेक्षा या वर्षी निकाल कमी लागल्याची पालकांमध्ये चर्चा रंगली होती. दिवसभर मित्र-मैत्रिणींचे व्हॉट्स अ‍ॅपवरून संदेश फिरत होते. तर, सकाळपासूनच निकालाची भीती वाटत असल्याने काहींनी निकालच पाहिला नाही. (प्रतिनिधी)रात्र प्रशाला : संदीप खुटकने मिळविले ८० टक्के चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा संदीप खुटक याने ८० टक्के गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. तो दिवसा काम करून रात्री अभ्यास करी. नवनाथ माने याने ७२ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक प्राप्त केला. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी दोघे दिवसा काम करतात. दिवसभर काम केल्यानंतर ते रात्री शाळेत जात होते. शिक्षकांचे मार्गदर्शन घेत त्यांनी अभ्यासात प्रगती केली. पाठांतर, लेखनासोबत उत्तर सोडविण्यावर त्यांनी भर दिला. शाळेत त्यामे सांस्कृतिक विभागात उत्कृष्ट कामगिरी केली. दोघांचे वक्तृत्व उत्तम आहे. महाविद्यालयाचा बारावीचा एकूण निकाल ८७ टक्के लागला आहे. एकूण २३ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती प्राचार्य संजय पवार यांनी दिली. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल चांगला लागावा, या हेतूने काही शिक्षकांकडून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे गुण सढळ हाताने दिले जात होते. परिणामी, विद्यार्थ्यांना १५ ते २० टक्के गुण सहज मिळत होते. त्यामुळेच निकालाची टक्केवारी वाढत चालली होती. मात्र, राज्य मंडळाने यंदा रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बहि:स्थ परीक्षांची नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे पर्यावरण शिक्षण परीक्षेसाठीही बहि:स्थ शिक्षक नियुक्त करण्यात आले. त्यामुळे गुणांवर यंदा नियंत्रण आले. परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या जात होत्या. त्यामुळे यंदा बारावीच्या निकालात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.- गंगाधर म्हामणेराज्य मंडळाचे अध्यक्ष