शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांनी अनुभवला पावसाबरोबर काळोख

By admin | Updated: November 24, 2015 00:59 IST

शहरात दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊन ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेचारनंतर अंधार दाटून येऊन सर्वत्र काळोख पसरला होता.

पिंपरी : शहरात दुसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर आकाशात काळे ढग जमा होऊन ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेचारनंतर अंधार दाटून येऊन सर्वत्र काळोख पसरला होता. पावसाची रिपरिप, काही वेळ ऊन आणि थंडी असा तिहेरी वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. धो धो पावसाने रविवारी रात्री शहवासीयांना झोडपून काढले होते. पाऊस इतका जोरदार होता की, समोरचे काही दिसत नव्हते. अनेक भागात पाणी साचून वाहतूककोंडी झाली. पाण्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी झाले. सखल भागातील घरांमध्ये पाणी साचले. काही भागात वीज गायब झाली. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळ आठपर्यंत पाऊस कायम होता. विश्रांती घेत दुपारी बारापर्यंत कडक ऊन पडले होते. सूर्यप्रकाशामुळे नागरिकांना हायसे वाटले. मात्र, दुपारनंतर वातावरण पुन्हा बदलले. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले. यात सूर्यही झाकोळला गेला. काहीशा अंधारातच दुपारी तीनच्या सुमारास पावसाची संततधार सुरू झाली. ती कायम होती. यामुळे अनेक भागात वाहतूक संथ होऊन कोंडी झाली. कालच्या पावसामुळे दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांनी रेनकोटचा वापर केला. अनेकांची डोक्यावर छत्री धरली होती. दिवाळीची सुटी संपून आज अनेक शाळा सुरू झाल्या. या विद्यार्थ्यांना पावसात भिजत ये-जा करावी लागली. काही विद्यार्थ्यांनी रेनकोट घातले होते. पावसाची संततधार, ऊन आणि थंडी अशा तिहेरी वातावरणाचा अनुभव आज नागरिकांनी अनुभवला. दरम्यान, या संमिश्र वातावरणामुळे सर्दी, थंडी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. (प्रतिनिधी)लोणावळ्यात जोरदार सरीलोणावळा : वातावरणात झालेल्या बदलामुळे रविवारी दुपारी व रात्री लोणावळा शहरात तब्बल ४५ मिमी पाऊस झाल्याने सर्वत्र रस्ते व सखल भागात पाणी तुंबले होते. शनिवारी सायंकाळपासून लोणावळा परिसरात ढगाळ वातावरण झाले होते. यामुळे उष्मा वाढला होता. रविवारी दुपारी सव्वाच्या सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला होता. रात्री पुन्हा लोणावळा शहर व ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा व वाऱ्याचा वेग इतका होता की, वाहने चालवताना समोरचे दिसत नव्हते. यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. दिवसा लागले दिवे...सायंकाळी साडेचारच्या सुमारास अंधार अधिक दाटून आल्याने सर्वत्र काळोख पसरला. त्याविषयी नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे घर, कार्यालय आणि परिसरातील विजेचे दिवे लवकरच पेटविण्यात आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तर रात्रीच्या अंधारासारखे वातावरण निर्माण झाले होते.