शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शहर समितीत फूट

By admin | Updated: October 23, 2016 03:48 IST

नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी तळेगाव शहर विकास समितीमध्ये फूट पडली आहे. फुटलेल्या गटाने तळेगाव जनसेवा विकास समितीची स्थापना केली

तळेगाव दाभाडे : नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी तळेगाव शहर विकास समितीमध्ये फूट पडली आहे. फुटलेल्या गटाने तळेगाव जनसेवा विकास समितीची स्थापना केली आहे. नवीन समिती भाजपशी संलग्न होऊन महायुती करण्याची शक्यता आहे. सध्या तळेगाव नगर परिषदेत राष्ट्रवादी व काँग्रेस प्रणित शहर विकास समितीची सत्ता आहे. मात्र, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आमदार बाळासाहेब भेगडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार आहे. शिवाय तळेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्षपद इतर मागास वर्ग (महिला) साठी राखीव झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शहर विकास समितीत फूट पाडण्यात विरोधी पक्षाला यश आले आहे. मात्र, सत्तापालट करण्यासाठी नवीन समिकरणे जुळवावी लागणार आहेत. आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, सुलोचना आवारे, अ‍ॅड. रवींद्रनाथ दाभाडे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भेगडे, चंद्रकांत शेटे, चंद्रकांत काकडे, सुशील सैंदाणे, नगरसेविका सुरेखा आवारे, समितीचे संस्थापक बाळासाहेब काकडे, तळेगाव शहर आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनवणे, शहर भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र आवारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर) तळेगाव शहराच्या सर्वांगीण विकास व नागरिकांच्या हितासाठी जनसेवा विकास समितीची स्थापना करण्यात आल्याचे निमंत्रक चंद्रभान खळदे व संग्राम काकडे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी सांगितले. आगामी पंचवार्षिक निवडणूक भारतीय जनता पक्ष, तळेगाव जनसेवा विकास समिती, आरपीआय (आठवले गट) ही महायुती करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी सांगितले.