शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर कारवाईची नागरिकांना धास्ती

By admin | Updated: March 18, 2017 04:44 IST

नगरविकास खात्याचे आदेश मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

पिंपरी : नगरविकास खात्याचे आदेश मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये कारवाईची भिती निर्माण झाली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजला आहे. महापालिका निवडणुकीतही याबाबत आश्वासने देण्यात आली. अनधिकृत बांधकामे नियमित करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, निवडणूक संपताच नगरविकास विभागाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, असा आदेश दिला आहे. नगरविकास खात्याचा आदेश अजूनही महापालिका आणि प्राधिकरण प्रशासनास मिळालेला नाही, असे सांगण्यात आले असले, तरी महापालिका व प्राधिकरण प्रशासनाने कारवाईचे नियोजन केले आहे. महापालिका निवडणूक कालखंडात राजकीय नेते आणि पक्षांच्या पाठिंब्याने मोठ्या प्रमाणावर महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसी,रेडझोन परिसरात कामे सुरू होती. राजकीय आशीर्वादाने सुरू असलेली कामे आजही सुरू आहेत. निवडणूक कामकाजात गुंतल्याचे सांगून महापालिका आणि प्राधिकरण परिसरात कारवाईस टाळाटाळ केली गेली. निवडणूक संपली असली, तरी महापालिका क्षेत्रात सर्वत्र, तसेच समाविष्ट गावांतही बांधकामे सुरू आहेत. राजकीय नेत्यांचे वर्चस्व असणाऱ्या भागातील बांधकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)धाबे दणाणलेमहापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, निवडणूक संपताच सरकारने अनधिकृत बांधकामे काढा, असा आदेश काढला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहे. अनधिकृत बांधकामे नियंत्रणाचे काम सुरू आहे. अनधिकृत बांधकामांना नोटीस देऊन त्यानुसार कारवाई केली जात आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम करू नये अन्यथा कायद्यानुसार कारवाई केली जाईल. - सुहासकुमार खडके (मुख्याधिकारी)